सातारा जिल्ह्यात नवे 787 कोरोना बाधित तर पाॅझिटीव्ह रेट 5.8 टक्के

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा | सातारा जिल्ह्यात शुक्रवारी रात्री 12 वाजता आलेल्या रिपोर्टमध्ये नवे कोरोना 787 पाॅझिटीव्ह आले आहेत. तर काल दिवसभरात 430 जण कोरोनामुक्त होवून घरी सोडण्यात आल्याची माहीती जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. सुभाष चव्हाण यांनी दिली. रात्री आलेल्या रिपोर्टमध्ये 13 हजार 373 चाचण्या तपासण्यात आल्यानंतर त्यामध्ये पाॅझिटीव्ह रेट 5.8 टक्के इतका आहे.

जिल्ह्यात उपचार्थ असलेल्या कोरोनाबाधितांची 11 हजार 810 झाली आहे. जिल्ह्यात आजपर्यंत एकूण कोरोनाबधितांची संख्या 2 लाख 29 हजार 578 इतकी झाली आहे. तर जिल्ह्यात एकूण 2 लाख 15 हजार 417 बरे झालेली रुग्णसंख्या आहे. तर कालपर्यंत 5 हजार 531 बाधितांचा मृत्यू झाला आहे. गुरूवारी दिवसभरात 13 कोरोना बाधितांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे.

गुरूवारी मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या तर गुरूवार अखेर मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या कंसात

जावली 0 (206), कराड 2 (1096), खंडाळा 0 (175), खटाव 0(534), कोरेगांव 0 (432), माण 1 (315), महाबळेश्वर 0 (87), पाटण 0 (347), फलटण 5 (556), सातारा 5 (1370), वाई 1 (339) व इतर 0 (74), असे आज अखेर जिल्ह्यामध्ये एकूण 5531 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.

Leave a Comment