स्टाईल इज स्टाईल : साताऱ्यात गृहराज्यमंत्री RX हंड्रेडवरून काॅलजेला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

सातारा शहरात काॅलेजमध्ये तरूण- तरूणींना अनेकदा समस्या येतात, तेव्हा पोलिस त्यावर नजर ठेवून असतात. परंतु आज चक्क राज्याचे गृहराज्यमंत्री (ग्रामीण) शंभूराज देसाई यांनी आपल्या आरएक्स 100 या दुचाकीवरून शहरातील काॅलेजना भेट दिली. तसेच विद्यार्थी- विद्यार्थींनींशी संवादही साधला. काॅलेज परिसरात चालत जावून पाहणीही केली.

पाटण विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार व गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई हे नेहमीच आपल्या हटके स्टाईलसाठी प्रसिध्द आहेत. अनेकदा दाैऱ्यात असणाऱ्या त्याचा ताफा असो की कोरोना काळात शहतील चालत फेरफटका असो किंवा आवडत्या आरएक्स 100 या दुचाकीवरून फिरणे यासाठी नेहमीच शंभूराज देसाई यांची चर्चा होत असते. आजही शहरातील काॅलेजमध्ये आरएक्स 100 वरून गृहराज्यमंत्री काॅलेजमध्ये दाखल झाल्याने तरूण- तरूणींच्यात एकच चर्चा सुरू होती, ती मंत्री महोदय दुचाकीवरून काॅलेजमध्ये आल्याचीच.

गृहराज्यमंत्र्यांची RX 100 वरुन काॅलेजची राईड; पहा व्हिडिओ

सातारा शहरातील पोवई नाका येथील आपल्या निवासस्थावरून कोणताही शासकीय लवाजमा न घेता भेटी दिल्या. यावेळी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई म्हणाले, कोव्हिडनंतर महाविद्यालय सुरू झाले आहेत. विद्यार्थींनीशी मी संवाद साधला. तेव्हा पोलिस कर्मचारी योग्य ती काळजी घेत असून निर्भया पथकाचे कर्मचारी योग्य ते सहकार्य करत असल्याचे सांगितले. काॅलेज परिसरात चुकीच्या पद्धतीने कोणी वर्तणूक करत असतील, तर त्यांना योग्य ते शासन केले जाईल. पोलिस कर्मचारी विद्यार्थ्यांना त्रास देणाऱ्या कधीही सोडणार नाहीत, यांची गैरवर्तणूक करणाऱ्यांनी समजून घ्यावे.

Leave a Comment