साताऱ्यात कंगना राणावत हिच्या पुतळ्याला शिवसैनिकांनी मारले जोडे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा | भारताला 1947 ला भीक मिळाली होती खरं स्वातंत्र्य तर 2014 ला मिळाले, असं वादग्रस्त वक्तव्य बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणावत हिने केल्यानंतर तिच्यावर सर्व स्तरातून टीका केली जात आहे. सातारा येथे आज कंगना राणावत हिच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. यावेळी सातारा शहर शिवसेनेच्या वतीने पोवई नाक्यावर कंगना राणावत हिच्या पुतळ्याला “जोडे मारो” आंदोलन करण्यात आले.

पोवई नाका येथे शिवसेनेने पुतळ्याला जोडे मारो आंदोलन केले. यावेळी उपस्थित पोलिसांनी शिवसेनेच्या आंदोलकांना रोखत पुतळा ताब्यात घेतला. यावेळी उपस्थित संतप्त शिवसैनिकांनी कंगना राणावत हीच्याविरोधात तीव्र घोषणाबाजी करत निषेध नोंदवला.

कंगणा राणावत हिने स्वातंत्र्य सैनिकांचा अपमान केला आहे. तिच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. तसेच तिला भारतात राहण्याचा कोणताही अधिकार नसल्याची संतप्त प्रतिक्रिया आंदोलनकांनी दिली.

Leave a Comment