चोरट्याचा डल्ला : साताऱ्यात डाॅक्टरांच्या कारची काच फोडून साडेतीन लाख लंपास

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा | सातारा शहरात बुधवारी सायंकाळी रस्त्याच्या बाजूला उभ्या केलेल्या डॉक्टरांच्या कारची काच फोडून साडेतीन लाखांची रोकड लंपास करण्यात आली. रस्त्यावर पार्क केलेल्या कारची पाठीमागील काच फोडून 3 लाख 59 हजार 200 रूपये लंपास करण्यात आले.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, सातारा शहरातील विसावा नाक्यावर एक हॉटेल आहे. बुधवारी सायंकाळच्या सुमारास हॉटेलसमोर रस्त्यावर कार (एमएच- 11 सीजी, 2400) पार्क केली होती. दरम्यान अज्ञात चोरट्याने कारची पाठीमागील बाजूची काच फोडून कारमधून रोख रक्कम आणि गाडीची तसेच रुग्णालयाची कागदपत्रे लंपास केली.

कारची काच फोडून चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर संतोष श्रीरंग यादव (रा. शाहूनगर, गोडोली, सातारा) यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे. याप्रकरणी हवालदार एस. के. पोळ हे तपास करीत आहेत.

Leave a Comment