कराड शहरात धोकादायक झाड इनोव्हा गाडीवर कोसळले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

कराड शहरात आज दिवसभर पावसाची रिमझिम सुरू आहे. अद्याप पावसाची जोरदार अशी बॅंटींग सुरू नाही. मात्र, दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास एक धोकादायक झाड कोसळून इनोव्हा गाडीचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने आज मंगळवार असल्याने बाजारपेठ बंद असल्याने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. कराड नगरपालिकेने अशी धोकादायक झाडे तसेच त्याच्या फांद्या तोडण्याची गरज आहे.

कराड शहरातील गुजर हाॅस्पीटलच्या पाठीमागील बाजूस एक झाड कोसळले. धोकादायक स्थितीत असलेले झाड कोसळल्याने गुजर हाॅस्पीटलच्या भीतींचेही नुकसान झाले आहे. हाॅस्पीटलच्या पाठीमागील बाजूस झाड पडले, तेथे दररोज अनेक महिला भांडी धुण्यासाठी तसेच व्यावसायिक कामानिमित्त असतात. आज मंगळवार असल्याने आणि बाजारपेठ बंद असल्याने याठिकाणी असणाऱ्या महिला घटनास्थळी नव्हत्या.

कराड शहरात अनेक ठिकाणी धोकादायक झाडे असून ती पावसाळ्याच्या अगोदर हटविण्यात आलेली नाहीत. त्यामुळे अशा दुर्घटना वाढत असताना दिसत आहेत. पावसाचे प्रमाण वाढत असताना झाडांच्या फांद्याही अनेक तोडलेल्या नाहीत. त्यामुळे झाडे कोसळण्याचे तसेच अपघाताचे प्रमाण वाढू शकते. तेव्हा नगरपालिकेने पावसाळा अगोदर लवकरात लवकर धोकादायक झाडे तोडण्याची मागणी नागरिकांच्यातून केली जात आहे.

Leave a Comment