फलटणच्या इतिहासात रामराजेंना लोक गद्दार संबोधतील : खा. रणजिंतसिंह निंबाळकर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

फलटण प्रतिनिधी| अनमोल जगताप
भविष्यात फलटणचा इतिहास वाचला जाईल. तेव्हा निरा देवघरच्या पाण्यासंदर्भात रामराजे यांनी मीठ खाल्लं फलटणच आणि नीट केलं बारामतीचे असा त्यात उल्लेख असेल. त्यामुळे येथील शेतकरी त्यांना आमचं वाटोळं केल असं म्हणत त्यांना गद्दार म्हणून संबोधतील असे उदगार खा. रणजितसिंह नाईक- निंबाळकर यांनी बिबी येथील संपर्क दौऱ्याच्या जाहीर सभेत काढले.

निरा देवघरची सुधारित प्रशासकीय मान्यता, त्यासाठी निधी उपलब्ध, रेल्वे, रस्ते, नाईकबोमवाडी एमआयडीसी करून तालुक्याचा चौफेर विकास केल्याने बीबी आणि आसपासच्या लोकांनी त्यांची पेढे तुला करत उदंड आयुष्याचा शुभेच्छा दिल्या. यावेळी जेष्ठ नेते प्रल्हाद सांळुखे पाटील उपस्थित होते. यावेळी भाजपा फलटण तालुकाध्यक्ष बजरंग गावडे, अमरसिंह उर्फ अभिजित ना. निंबाळकर, अमित रणवरे, पै. शंभुराजे बोबडे, सिराजभाई शेख, विशाल नलवडे, दत्तात्रय पवार, गजानन शिंदे, विशाल बोबडे, जगन्नाथ शिंदे, अमोल बोबडे, सचिन बोबडे, लहुराज मोहिते, हिंदराज कदम, हिरालाल सरक, संतोष सावंत, अक्षय पटेल, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.

खा. रणजिंतसिंह नाईक म्हणाले, पाऊण टीएमसीचे भगीरथ म्हणवणाऱ्यांना निरा देवघरचे आपल्या वाटेचे पाणी बारामतीला दिले, ते पुन्हा आपण खासदार झाल्यावर तालुक्यात वळवले. या फलटण तालुक्याचा विकास हेच माझे व्हिजन असल्याचे सांगत आ. रामराजेंवर जोरदार टीका केली. निरा देवघरचे कॅनॉलचे काम करण्याची इच्छा असती. तर रामराजेंनी एका दिवसात ते केले असते, परंतु ते त्यांना करायचे नव्हते. जनतेला झुलवत ठेवायचे होते. जनतेची कामे करतोय म्हणून मला खलनायक उपाधी देत आहात. अजितदादा पवार यांनी बारामतीचा विकास केला तसा तुम्हाला फलटणचा विकास काकरता आला नाही? लवकरच रेल्वेचे टेंडर निघणार असून रेल्वेच्या कामाला अधिक गती येणार आहे. कमिन्ससारख्या मोठ्या कंपनी मधील तरूण वर्गाचा निम्मा पगार बंगल्यावर जातो तो कसा काय ? त्यासाठी तुम्ही भीमदेव बुरुंगलेला नेमला असून तुम्ही किती भ्रष्टाचारी आहात, हे लोकांना माहित झाले आहे.

भाजपाच्या माध्यमातून चाैफेर विकास ः खा. रणजिंतसिंह
उपळवेचा कारखाना गेल्या आठ वर्ष झाले सुरू असून तो चांगल्या पद्धतीने चालला आहे. नाईकबोमवाडी एमआयडीसीचे भूमिपूजन होऊन उद्योग व्यवसाय सुरु होणार असल्याने याबाबतीतही रामराजे तोंडावर आपटले आहेत. भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून चौफेर विकास चालला आहे. हजारो रुपयांची कामे मतदारसंघात होत आहेत. येणाऱ्या निवडणुकीला सामोरे जात असताना. त्या निवडणूका ताकतीने लढवून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हात बळकट करण्याचे काम आपल्याला करायचे असल्याचेही खा. रणजिंतसिंह नाईक- निंबाळकर म्हणले.