राज्यात उद्यापासून १२ वी ची परीक्षा सुरु…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

.पुणे | राज्यात उद्यापासून बारावी बोर्डाच्या परीक्षेस सुरवात होत आहे. यंदा या परीक्षेसाठी १४ लाख ९१ हजार ३०६ विद्यार्थी बसले आहेत.२१ फेब्रुवारी ते २० मार्च २०१९ या दरम्यान ही परीक्षा होणार आहे.यामध्ये ८ लाख ४२ हजार ९१९ विद्यार्थी तर ६ लाख ४८ हजार १५१ विद्यार्थिनी परीक्षा देणारे आहेत.राज्यात एकूण २९५७ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेतली जाणार आहे.
कला, वाणिज्य, विज्ञान व किमान कौशल्य या विभागातील विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.या वर्षी हॉलतिकिट ऑनलाईन मिळणार आहे. परीक्षेला जाताना विद्यार्थ्यांना मोबाईल फोन नेता येणार नाही.त्याचबरोबर शिक्षक ,कर्मचारी यांना आपले मोबाईल केंद्र संचालकांकडे जमा करावे लागतील, अशी माहिती राज्य मंडळाच्या अध्यक्ष शकुंतला काळे यांनी दिली. यामुळे पेपर फुटी रोखण्यास मदत होईल असे त्या म्हणाल्या.
यावर्षी एक दिव्यांग विद्यार्थिनीला तिच्या वैद्यकीय कारणामुळे आईपॅड वर परीक्षा देण्यास मंडळाने परवानगी दिली आहे.विद्यार्थ्यांनी मंडळाने संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेले आणि छपाई केलेले वेळापत्रक ग्राह्य धरावे असे मंडळाने स्पष्ट केले आहे.

इतर महत्वाचे –

युती ‘या’ अटींवर – शिवसेना मंत्री रामदास कदम

‘पैसे भरा नाहीतर तुरुंगात जा’ सर्वोच्च न्यायालयाचा अनिल अंबांनी यांना दणका

अखेर ‘त्यांनी’ अण्णांची लेखी माफी मागितली

भारताला पाक कडून ही धमकी ..

Leave a Comment