घरगुती सिलेंडरचा काळाबाजार करणारे पोलिसांच्या जाळ्यात; तब्बल 66 सिलेंडर जप्त

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – घरगुती सिलिंडरचा काळाबाजार करणाऱ्या सेंटरवर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी छापा मारत दोघांना ताब्यात घेतले आहे ही कारवाई मंगळवारी मोती कारंजा भागात करण्यात आली. मुकीम करीमोद्दीन अंसारी (34) आणि शेख हाफिज शेख हबीब (45) असे गॅस रेफिल्लींग सेंटर मालकांचे नाव आहे. पोलिसांनी या कारवाईत 66 सिलेंडर जप्त केले आहेत.

शहरातील मोतीकारंजा भागात घरगुती गॅस सिलेंडरचा साठा करून काळाबाजार सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखा पोलिसांना मिळाली होती. त्यावरून पुरवठा निरीक्षक सोनवणे यांच्यासह गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दत्ता शेळके, नंदकुमार भंडारे, किरण गावंडे, संजयसिंह राजपूत, ओमप्रकाश बनकर, धर्मराज गायकवाड, नितीन देशमुख, ज्ञानेश्वर पवार यांच्या पथकाने संबंधित ठिकाणी छापा मारला.

या कारवाईत मुकीम अन्सारी आणि शेख हबीब हे घरगुती गॅस अवैधरित्या भरताना आढळले. यांच्याकडून पोलिसांनी घरगुती वापराचे 66 सिलेंडर जप्त केले आहेत. या प्रकरणी क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Comment