व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

इशारा !!! आता मोठ्या व्यवहारांवर Income Tax Department ठेवणार लक्ष, पकडताच बजावणार नोटीस

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Income Tax Department कडून आता करदात्यांच्या प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवली जात आहे. यामध्ये खर्च आणि ट्रान्सझॅक्शनशी संबंधित डेटा देखील सामील आहे. यामध्ये जर विहित मर्यादेपेक्षा जास्त ट्रान्सझॅक्शन झाले असतील आणि आपण ते ITR मध्ये त्याचा खुलासा केलेला नसेल तर इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडून नोटीस सिली जाऊ शकेल.

Income Tax Department Raided Two Real Estate Companies Of Tamil Nadu,  Seized 500 Crores - Income Tax Raid: दो कंपनियों पर छापे में मिला 500 करोड़  का कालाधन - Amar Ujala Hindi News Live

आता अशा ट्रान्सझॅक्शनवर लक्ष ठेवण्यासाठी Income Tax Department कडून सर्व सरकारी संस्था आणि वित्तीय संस्थांशी करार करण्यात आला आहे. करदात्यांना गैरसोयीपासून वाचवण्यासाठी इन्कम टॅक्स डिपार्टमेंटतर्फे याबाबत जनजागृती मोहीमही राबविण्यात येते आहे. अशा परिस्थितीत, आपल्याकडे या ट्रान्सझॅक्शनची माहिती असणे आवश्यक आहे, जेणेकरून इन्कम टॅक्स नोटीस टाळता येऊ शकेल. हे लक्षात ठेवा कि, इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडून प्रामुख्याने सहा प्रकारच्या ट्रान्सझॅक्शनवर नजर ठेवली जाते. चला तर मग त्याविषयी जाणून घेउयात…

1- सेव्हिंग आणि करंट अकाउंटमधील डिपॉझिट्स आणि पैसे काढणे

Income Tax Department चे म्हणणे आहे की, करदात्यांना त्यांच्या सेव्हिंग आणि करंट अकाउंटमधील विहित मर्यादेपेक्षा जास्त वार्षिक ट्रान्सझॅक्शनची माहिती द्यावी लागेल. या अंतर्गत सेव्हिंग अकाउंट मध्ये एका आर्थिक वर्षात 10 लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम जमा किंवा काढण्याबाबतची माहिती द्यावी लागेल, तर करंट अकाउंटच्या बाबतीत ही रक्कम 50 लाख रुपये असेल.

2- बँकेत जमा असलेली FD

जर आपण बँकेमध्ये एका आर्थिक वर्षात 10 लाख रुपयांहून जास्त रुपयांची FD केली असेल तर Income Tax Department यासाठी नोटीस जारी करू शकेल. बँकेकडून इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या फॉर्म 61A द्वारे ही माहिती दिली जाते. ही रक्कम एकाच FD ची असो किंवा एकत्रितपणे अनेक FD ची असो, आपल्याला ही माहिती द्यावीच लागेल.

इनकम टैक्स से बचने के लिए कहीं आप तो नहीं अपना रहे गलत हथकंडे, सावधान...  सॉफ्टवेयर बता रहा है टैक्स चोरों के नाम | TV9 Bharatvarsh

3- क्रेडिट कार्ड बिल

जर आपले क्रेडिट कार्डचे बिल 1 लाख रुपयांपेक्षा जास्त आले असेल तर त्याबाबत Income Tax Department ला कळवावे लागेल. याशिवाय, जर क्रेडिट कार्ड सेटलमेंट 10 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर ही माहिती देखील इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला द्यावी लागेल, अन्यथा नोटीस मिळू शकेल.

4- स्थावर मालमत्तेची खरेदी आणि विक्री

देशभरातील रजिस्‍ट्रार आणि सब-रजिस्‍ट्रारनी 30 लाख रुपयांवरच्या स्थावर मालमत्तेच्या खरेदी-विक्रीबाबतची माहिती Income Tax Department ला देणे आवश्यक आहे. तसेच ITR मध्ये त्याचा खुलासा न केल्यास नोटीस मिळू शकेल.

5- शेअर्स, म्युच्युअल फंड, बाँडशी संबंधित ट्रान्सझॅक्शन

कोणत्याही एका आर्थिक वर्षात म्युच्युअल फंड, स्टॉक, बॉण्ड्स आणि डिबेंचर्समधील गुंतवणुकीची मर्यादा 10 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर ते उघड करावी लागेल. अशा ट्रान्सझॅक्शनचा तपशील वार्षिक माहिती ITR मध्ये ठेवली जाते. आपल्या फॉर्म 26AS च्या भाग E मध्ये या सर्व ट्रान्सझॅक्शनशी संबंधित माहिती असते.

6- परकीय चलनाची विक्री

जर आपण एका आर्थिक वर्षात 10 लाख रुपयांपेक्षा जास्त परकीय चलन विकले तरीही Income Tax Department च्या टारगेटवर असाल. त्याचीही माहिती ITR मध्ये द्यावी लागेल.

Income Tax Department conducts searches in Pune | A2Z Taxcorp LLP

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://incometaxindia.gov.in/

हे पण वाचा :

Investment : Post Office च्या ‘या’ योजनेद्वारे मिळवा बँकांच्या FD पेक्षा जास्त व्याज !!!

Mutual Fund द्वारे अशा प्रकारे गुंवणूक करून मिळवून भरपूर रिटर्न !!!

Gold Price Today : सोने महागले तर चांदी झाली स्वस्त !!! नवीन दर पहा

Hyundai Tucson 2022 : ह्युंदाईची नवी Tucson बाजारात लॉन्च; पहा फीचर्स आणि किंमत

Income Tax वाचवण्यासाठीचे काही सोपे उपाय जाणून घ्या