इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने करदात्यांना पाठवले 1.54 लाख कोटी रुपये, रिफंडचे स्टेट्स अशाप्रकारे तपासा

नवी दिल्ली । इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने चालू आर्थिक वर्षात (2021-22) 10 जानेवारी 2022 पर्यंत 1.59 कोटींहून जास्त करदात्यांना 1,54,302 कोटी रुपयांहून अधिक रक्कम परत केली आहे. हा आकडा 1 एप्रिल 2021 ते 10 जानेवारी 2022 दरम्यान केलेल्या रिफंड चा आहे. यामध्ये पर्सनल इन्कम टॅक्स रिफंड 53,689 कोटी रुपये होता, तर कॉर्पोरेट्सचा रिफंड 1,00,612 कोटी रुपये होता.

इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने ट्विट केले की, “CBDT ने 1 एप्रिल 2021 ते 10 जानेवारी 2022 दरम्यान 1.59 कोटी करदात्यांना 1,54,302 कोटी रुपयांहून जास्त रिफंड दिला आहे. 1,56,57,444 प्रकरणांमध्ये 53,689 कोटी रुपयांचा इन्कम टॅक्स रिफंड आणि 2,21,976 प्रकरणांमध्ये 1,00,612 कोटी रुपयांचा कॉर्पोरेट टॅक्स रिफंड जारी करण्यात आला आहे.

गेल्या आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये, इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने 2.38 कोटी करदात्यांना 2.62 लाख कोटी रुपयांचा टॅक्स रिफंड जारी केला होता. 2019-20 या आर्थिक वर्षात जारी केलेल्या 1.83 लाख कोटी रुपयांच्या रिफंडच्या तुलनेत हे 43.2 टक्के जास्त आहे.

इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या नवीन वेबसाइटवरून रिफंडचे स्टेट्स तपासा-
>> सर्वप्रथम तुम्हाला http://www.incometax.gov.in या वेबसाइटवर जावे लागेल.
>> यूझर आयडी आणि पासवर्ड टाका.
>> लॉगिन केल्यानंतर तुम्हाला ई-फायलिंगचा पर्याय दिसेल.
>> आता तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न निवडा
>> त्यानंतर View File Return वर क्लिक करा.
>> आता तुमच्या ITR चे डिटेल्स दाखवले जातील.