अबब… अत्तर व्यावसायिकाच्या घरात सापडलं पैशांच घबाड; अधिकारीही चक्रावले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्याच्या काळात पैशांची साठवणूक करणे हे खुप धोक्याचे आहे. कारण जर मोठ्या प्रमाणात पैसे साठवले तर आयकर विभागाला कळल्यास ते धाडीही टाकतात. त्यानंतर मिळालेली रक्कम ती जप्त केली जाते. आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी कानपूर येथील अत्तर व्यावसायिकाच्या घरी नुकतीच धाड टाकली. यामध्ये त्यांना एक नव्हे तर तब्बल 150 कोटी इतकी रक्कम आढळून आली. ती मोजण्यासाठी आठ मशीन्स आणि अख्खा एक दिवस त्या अधिकाऱ्यांना अपुरा पडला. एवढी मोठी रक्कम पाहिल्यानंतर अधिकारीही चक्रावून गेले.

याबाबत अधिक माहिती अशी की, कानपूरमध्ये पियुष जैन हे व्यवसाय अत्तर विक्रीचा व्यवसाय करतात. त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात पैसे असल्याची माहिती आयकर विभागाला मिळाली त्यानंतर आयकर विभागातील अधिकाऱ्यांनी पियूष जैन यांच्याशी संबंधित मालमत्तांवर ही धाड टाकली. त्यानंतर या धाडीची माहिती वेगावने सोशल मीडियावर पसरली आहे. आयकर विभागाने केलेल्या कारवाईचा फोटो समोर आला असून पैशांचा ढिग दिसून येतो आहे. हे पैसे प्लास्टिकच्या पिशवीत ठेवूनत त्यावर चिकटपट्टी लावल्याचे दिसत आहे.

आयकर विभागातील अधिकाऱ्याना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी गुरूवारी ही धाड टाकण्यात आली असून कानपूर, उत्तर प्रदेश, मुंबई आणि गुजरात या ठिकाणी ही कारवाई सुरू आहे. कर चोरी केलुयाप्रकरणी आयकर विभाग तसेच जीएसटीकडूनही कारवाई करण्यात आली आहे.आत्तापर्यंत या धाडीत 150 कोटी रूपये आढळले आहेत. एखाद्या अत्तर व्यावसायिकाच्या घरी आणि धाडी दरम्यान एवढी मोठी रक्कम मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे.

अत्तर व्यावसायिक मोठ्या नेत्याचे निकटवर्तीय

आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांकडून जी कारवाई करण्यात आली आहे त्यातील आरोपी पियूष जैन हे समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. अखिलेश यादव यांनीच त्यांच्या अत्तराचं लाँचिंग केले होते. सोशल मीडियावर या फोटोंची आणि या कारवाईची चांगलीच चर्चा सुरू झाली आहे.

Leave a Comment