Income Tax raid : Dolo 650 टॅबलेट बनवणाऱ्या कंपनीवर आयकर विभागाचे छापे, करोडोंची बेहिशेबी रोकड आणि दागिने जप्त

0
98
Income Tax raid
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Income Tax raid  : कोरोना काळात लोकांना लोकप्रिय झालेल्या डोलो 650 ही टॅबलेट बनवणाऱ्या कंपनीवर आयकर विभागाने छापेमारी केली आहे. बुधवारी आयकर विभागाने सांगितले की, त्यांनी बेंगळुरूस्थित फार्मा कंपनी मायक्रोलॅब्स लिमिटेडवर छापा टाकला. ज्यामध्ये 1.20 कोटी रुपयांची बेहिशेबी कॅश, 1.40 कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीचे सोने आणि हिऱ्यांचे दागिने जप्त करण्यात आले. आयकर विभागाने पुढे सांगितले की, या छापेमारी दरम्यान, कागदपत्रे आणि डिजिटल डेटाच्या रूपात भक्कम पुरावे सापडले आहेत. 6 जुलै रोजी ही मोहीम राबविण्यात आली.

बेंगलुरू में माइक्रो लैब्स के सीएमडी दिलीप सुराणा के ठिकानों पर आयकर का  छापा; 40 स्थानों पर सर्च जारी - Republic Bharat

बंगळुरू-मधील मायक्रो लॅब्स फार्मास्युटिकल ग्रुप फार्मास्युटिकल प्रॉडक्ट्स, त्यांचे मार्केटिंग आणि ऍक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रिडियंट्स (APIs) च्या प्रॉड्क्शनमध्ये गुंतलेला आहे. हे लक्षात घ्या कि, या ग्रुपचा व्यवसाय 50 हुन जास्त देशांमध्ये पसरलेला आहे. 9 राज्यांतील सुमारे 36 कॅम्पसवर छापे टाकण्यात आले. सविस्तर तपास सुरू आहे. Income Tax raid

Dolo-650 maker doled out freebies to doctors worth ₹1000 cr: I-T Dept -  Fortune India

मेडिकल प्रोफेशनल्सना दिले गिफ्ट्स

आयकर विभागाच्या म्हणण्यानुसार, यावेळी सापडलेल्या पुराव्यावरून असे दिसून आले की या फार्मा ग्रुपने ‘सेल्स अँड प्रमोशन’ च्या नावाखाली मेडिकल प्रोफेशनल्सना गिफ्ट्सचे वाटप केले. तसेच या ग्रुपने आपली उत्पादने/ब्रँडचा प्रचार करण्यासाठी अनैतिक पद्धतींचा अवलंब केला आहे. आयटी विभागाने असेही सांगितले की, अशा मोफत मिळणाऱ्या रकमेचे प्रमाण अंदाजे 1,000 कोटी रुपये आहे. Income Tax raid

Income Tax Department conducts searches in Maharashtra

कर चुकवेगिरी

छापेमारी दरम्यान असेही आढळून आले की, या ग्रुपकडून उत्पन्नाच्या संदर्भात विशेष तरतुदींनुसार खोटी कपात दाखविली गेली आहे, अशा प्रकारे त्यांच्याकडून जवळपास 300 कोटी रुपयांची करचोरी करण्यात आली आहे. या छापेमारी दरम्यान 1.20 कोटी रुपयांची बेहिशेबी रोकड आणि 1.40 कोटी रुपयांचे सोने आणि हिऱ्यांचे दागिने देखील जप्त केले गेले आहेत. हे लक्षात घ्या कि, मायक्रोलॅब्सच्या डोलो 650 ने COVID-19 दरम्यान प्रचंड नफा कमावला. तसेच या काळात ही कंपनी या क्षेत्रातील मार्केट लीडर बनली. Income Tax raid

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : http://www.microlabsltd.com/

हे पण वाचा :

Gold Investment : सध्याच्या जोखमीच्या काळात सोन्यामध्ये गुंतवणूक करावी की नाही ???

ICICI Bank कडून FD वरील व्याज दरात वाढ, नवीन दर तपासा

Corona चा नवीन BA.5 व्हेरिएन्ट आधीपेक्षा जास्त घातक आहे का ???

Petrol Diesel Price : महाराष्ट्र नाही तर आता ‘या’ राज्यात मिळेल महाग पेट्रोल

खुशखबर !!! Crude Oil पाच महिन्यांच्या नीचांकी पातळीवर, पेट्रोल-डिझेलच्या किंमती कमी होणार ???

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here