Wednesday, February 1, 2023

अजित पवारांना धक्का; पार्थ पवारांच्या कार्यालयावर आयकर विभागाचा छापा

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या मुंबईतील नरिमन पॉईंट येथील कार्यालयावर आयकर विभागाकडून छापेमारी करण्यात आली आहे. याआधी आयकर विभागाने अजित पवार यांच्या तीन बहिणींच्या घरावरही छापा टाकला होता. त्यामुळे अजित पवारांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

अनंता मर्क्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीवर प्राप्तीकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी छापा टाकला. पार्थ पवार हेच अनंता मर्क्स कंपनीचे संचालक आहेत. मुंबईतील नरिमन पॉईंट परिसरात कंपनीच्या कार्यालय आहे. प्राप्तीकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी दुपारी झाडाझडती घेतली.

- Advertisement -

पार्थ पवार यांचे कार्यालय, शिवालिक ग्रुप, चोराडिया, अजित पवार यांच्या बहिणींच्या घरी, डीबी रियालिटी, विवेक जाधव यांचे घर, अशा काही ठिकाणी आयकर विभागाची छापेमारी सुरु असल्याची माहिती मिळत आहे.