नवी दिल्ली । तुम्ही तुमचा इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) वेळेवर भरला आहे. आर्थिक वर्ष 2020-21 साठी ITR दाखल करताना तुम्ही टॅक्स रिफंड क्लेम केला आहे, मात्र तुम्ही क्लेम केलेल्या रिफंडची रक्कम कमी होती का? जर हो असेल तर अजिबात घाबरू नका, कारण असे होणारे तुम्ही एकटे नाही आहात. अनेक करदात्यांना त्यांच्या बँक खात्यांमध्ये कमी टॅक्स रिफंड मिळाला आहे.
इन्कम टॅक्स डिपार्टमेंट टप्प्याटप्प्याने पैसे रिफंड करत आहे. मात्र अशीही काही प्रकरणे समोर आली आहेत ज्यात लोकांना त्यांनी क्लेम केलेल्या रकमे एवढे पैसे मिळाले नाही. कारण नवीन इन्कम टॅक्स पोर्टलमधील तांत्रिक बिघाडामुळे करदात्यांना कमी टॅक्स रिफंड मिळत आहे.
Tax2win.in चे सीईओ अभिषेक सोनी यांच्या मते, अशी काही प्रकरणे समोर आली आहेत ज्यात करदात्याचा रिटर्न फॉर्म योग्य आहे मात्र क्लेमच्या तुलनेत कमी रिफंड मिळाला आहे. इन्कम टॅक्स डिपार्टमेंट लवकरच ही अडचण दूर करेल आणि लोकांना त्यांचा योग्य रिफंड मिळू शकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
इन्कम टॅक्स पोर्टलवर येणाऱ्या अडचणींमुळे ITR भरण्याची तारीख 31 डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे.