नोकरदारांसाठी खुशखबर! EPFO च्या व्याजदरात होणार वाढ; बैठकीत होणार अंतिम निर्णय

EPFO
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्र सरकारने (Central Government) 12 लाख रुपयांपर्यंतचे वार्षिक उत्पन्न करमुक्त केल्यानंतर आता नोकरदारांसाठी आणखीन एक दिलासादायक बातमी समोर येण्याची शक्यता आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) खातेदारांना अधिक लाभ मिळावा यासाठी केंद्र सरकार व्याजदर वाढवण्याचा विचार करत आहे. याबाबत अंतिम निर्णय 28 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (EPFO) केंद्रीय विश्वस्त मंडळ (CBT) बैठकीत घेतला घेतला जाऊ शकतो.

EPF व्याजदरात वाढ होणार?

गेल्या काही वर्षांत EPF व्याजदरात किरकोळ वाढ करण्यात आली होती. 2022-23 या आर्थिक वर्षात हा दर 8.15% होता, तर 2023-24 मध्ये तो 8.25% करण्यात आला. त्यामुळे यंदाही व्याजदरात वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नोकरदारांना अधिक परतावा मिळावा आणि त्यांच्या भविष्यातील आर्थिक सुरक्षिततेसाठी सरकार महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ शकते. असे झाल्यास नोकरदारांना मोठा दिलासा मिळेल.

CBT बैठकीत होणार महत्त्वाचा निर्णय

EPFOच्या 237व्या CBT बैठकीचे अध्यक्ष केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री उपस्थित असणार आहेत. तसेच, या बैठकीत केंद्र आणि राज्य सरकारचे अधिकारी, नियोक्ता संघटनांचे प्रतिनिधी तसेच कामगार संघटनांचे सदस्य सहभागी होणार आहेत. यावेळी पीएफच्या व्याजदरासंदर्भात अंतिम निर्णय घेण्यात येईल.

EPF व्याजदर वाढल्यास होणारे फायदे

जर EPFOने व्याजदर वाढवण्याचा निर्णय घेतला, तर नोकरदारांची मोठी आर्थिक बचत होणार आहे. यासह जमा केलेल्या निधीवर अधिक परतावा मिळाल्यास भविष्यातील आर्थिक नियोजन अधिक सोपे होईल. निवृत्तीनंतर आर्थिक स्थैर्य मिळवण्यास हा निर्णय उपयुक्त ठरू शकतो.

EPFO सदस्यसंख्येत वाढ

EPFOच्या अहवालानुसार, या संस्थेत सहभागी होणाऱ्या आस्थापनांची संख्या आणि योगदान देणाऱ्या सदस्यांची संख्याही सातत्याने वाढत आहे. 2022-23 मध्ये योगदान देणाऱ्या सदस्यांची संख्या 6.85 कोटी होती, जी 2023-24 मध्ये 7.37 कोटींवर पोहोचली आहे. यामुळे EPF व्याजदर वाढीचा थेट फायदा मोठ्या प्रमाणावर कर्मचाऱ्यांना होऊ शकतो.