इंदुरीकर महाराजांच्या अडचणीत वाढ? आता उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : पुत्र प्राप्ति बद्दल वक्तव्य करणाऱ्या प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख , इंदुरीकर महाराज्यांच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ होण्याची शक्यता आहे. वादग्रस्त वक्तव्य प्रकरणी संगमनेर न्यायालयाने इंदुरीकरांना दिलासा दिला आहे. मात्र इंदुरीकर महाराजांच्या विरोधात आता उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली आहे. पुत्र प्राप्ति बद्दलच्या वक्तव्यावरून अंधश्रद्धा निर्मूलन समितीने याचिका दाखल केली आहे. या प्रकरणी आठवड्यानंतर पुढील सुनावणी होणार आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, या प्रकरणात संगमनेर जिल्हा सत्र न्यायालयाने खटला रद्द केला होता त्यानंतर आता आणि अंनिसने उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली आहे. या याचिकेत अंनिसने इंदुरीकर महाराजांसह सरकारी पक्षाला ही प्रतिवादी केले आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य सचिव तथा याचिकाकर्त्या रंजना गवांदे यांनी याबाबतची माहिती दिली आहे.

इंदुरीकर महाराजांच्या ‘या’ वक्तव्यामुळे वाद

“स्त्री संग सम तिथीला झाला तर मुलगा होतो, विषम तिथीला झाला तर मुलगी होते आणि स्त्री संग अशीव वेळी झाला तर होणारी संतती रांगडी, बेवडी आणि खानदान मातीत घालणारी होते” असं वादग्रस्त वक्तव्य महाराज इंदोरीकर यांनी केले होते. लिंग भेदभाव करणाऱ्या या वक्तव्यानंतर जिल्हा आरोग्य विभागाने इंदोरीकर महाराजांना पीसीपीएनडीटी कायद्यानुसार नोटीस बजावत स्पष्टीकरण मागितलं होतं. यावर दिलेल्या कालावधीच्या अखेरच्या दिवशी इंदोरीकरांनी आपल्या वकिलामार्फत उत्तर देत खुलासा केला होता.इंदोरीकर महाराज यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावर टीकेची एकच झोड उठली होती. काही सामाजिक संघटना आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीने इंदुरीकर महाराजांवर गुन्हा दाखल करा अशी मागणी केली होती

 

Leave a Comment