ind vs eng : टीम इंडियाचा धोखा टळला ! इंग्लंडचा ‘हा’ दिग्गज गोलंदाज टी 20, वन डे संघातून बाहेर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन  | ind vs eng : 1 जुलैपासून इंडिया आणि इंग्लड यांच्यातील कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. त्यानंतर टीम इंडिया टी 20 आणि वनडे मालिका खेळणार आहे. टीम इंडियाचा सध्या सराव सामना सुरु आहे. यादरम्यान टीम इंडियासाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. इंग्लंडचा स्टार लेगस्पिनर आदिल रशीद टी 20 आणि वनडे सीरीजमध्ये इंग्लंडकडून खेळणार नाही आहे. रशीद टी 20 ब्लास्ट स्पर्धेत यॉर्कशायरकडून खेळत होता. पण आता त्याला ECB आणि यॉर्कशायर दोघांकडून सुट्टी मिळाली आहे. हज यात्रेला जाण्यासाठी आदिल रशीदने ही सुट्टी मागितली होती.

Adil Rashid could be handed surprise England Test recall this winter |  England cricket team | The Guardian

रशीद मक्काला रवाना होणार

आदिल रशीद शनिवारी मक्कासाठी रवाना होणार आहे. पुढच्या महिन्यात जुलै मध्ये तो इंग्लंडमध्ये परतण्याची शक्यता आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी रशीद उपलब्ध असेल अशी इंग्लंड क्रिकेट बोर्डाला अपेक्षा आहे. “मला मक्का येथे जायचं होतं. पण वेळ मिळत नव्हता. यावर्षी इथे गेलच पाहिजे अशी माझ्या मनात इच्छा निर्माण झाली” असं राशीदने सांगितले. ind vs eng

Adil Rashid confirms shoulder problem is easing after pre-World Cup scare |  The Cricketer

इंग्लंड क्रिकेट बोर्डने दिली परवानगी

इंग्लंड क्रिकेट बोर्डाने आदिल रशीदला हज यात्रेला जाण्यासाठी परवानगी दिली आहे. “आमच्यासाठी हा मोठा क्षण आहे. प्रत्येक धर्मात वेगवेगळ्या गोष्टी असतात. हज यात्रा ही इस्लाम मध्ये महत्त्वपूर्ण मानली जाते. भारताविरुद्ध मालिका खेळायचीय, हे माझ्या डोक्यात आलं नाही. मला जायचय बसं, एवढाच विचार मी केला” असे आदिल रशीदने यावेळी सांगितले. ind vs eng

ICC CWC'19: 'I fully trust Eoin Morgan's decisions', says England's Adil  Rashid

हे पण वाचा :

लहान व्यावसायिकांसाठी OYO ची खास ऑफर, हॉटेल बुकिंगवर मिळणार 60% सूट !!!

Canara Bank ने सुरु केली स्पेशल FD, असा असेल व्याज दर !!!

Vladimir Putin : आता रशियामध्ये सुरु होणार भारतीय सुपरमार्केटची साखळी, ब्रिक्स परिषदेत पुतिन यांनी दिले संकेत

Multibagger Stocks : राकेश झुनझुनवालाची गुंतवणूक असलेल्या ‘या’ शेअर्सने 2 वर्षांत दिला 175% रिटर्न !!!

PM Kisan च्या e-KYC ची शेवटची तारीख पुन्हा वाढवण्यात आली, अशा प्रकारे पूर्ण करा प्रक्रिया

 

Leave a Comment