टीम इंडियाची धुलाई! जो रुटने ठोकली डबल सेंचुरी; ‘हे’ विश्वविक्रम केले नावावर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

चेन्नई । भारताविरुद्धच्या पहिल्याच कसोटी सामन्यात इंग्लंडचा कर्णधार जो रुटने टीम इंडियाची चांगली धुलाई करत चांगला जम बसवला आहे. चेन्नईत सुरू असलेल्या पहिल्या कसोटीत रुटने पहिल्या दिवशी शतक तर दुसऱ्या दिवशी द्विशतक पूर्ण केले. ताज्या माहितीनुसार, जो रूट २१८ धावांवर बाद झाला आहे. तर इंग्लंडची धावसंख्या ४७७ वर ६ गाडी बाद अशी आहे.

दरम्यान, या सामन्यात रूट एकामागून एक विक्रम रचतआहेत. रुट आपला १०० वा कसोटी सामना खेळत आहे. या शंभराव्या कसोटी सामन्यात सर्वाधिक धावा करण्याचा विश्वविक्रम रुटने रचला आहे. यापूर्वी हा विक्रम पाकिस्तानचा फलंदाज इंझमाम उल हकच्या नावावर होता. इंझमामने आपल्या १००व्या कसोटी सामन्यात १८४ धावा केल्या होत्या. पण रुटने आपल्या १०० व्या कसोटीत द्विशतक झळकावले आणि इंझमामचा हा विश्वविक्रम मोडीत काढला आहे.

रुटने चेन्नईत शतक करण्याआधी श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत त्याने पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात २२८ तर दुसऱ्या कसोटीत १८६ धावा केल्या होत्या. पहिल्या दिवशी रूटने शतक झळकावले. रुटचे ही १००वी कसोटी आहे. १००व्या कसोटीत शतक करणारा तो ९ वा खेळाडू ठरला. त्याच बरोबर ९८, ९९ आणि १००व्या कसोटीत शतक करणारा जो रूट हा जगातील पहिला क्रिकेटपटू ठरला होता. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी रुटने दीड शतक पूर्ण केले. रुटचे कसोटी क्रिकेटमधील सलग तिसरे दीड शतक ठरले.

कसोटी क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत रुट आता सातव्या स्थानावर पोहोचला आहे. या यादीत श्रीलंकेचा कुमार संगकारा पहिल्या स्थानावर आहे. त्याने २००७ साली सलग चार वेळा १५० हून अधिक धावा केल्या. दुसऱ्या क्रमांकावर विली हेमंड असून त्यांनी १९२८-२९ मध्ये तीन वेळा अशी कामगिरी केली. दिग्गज फलंदाज डॉन ब्रॅडमन (१९३७), जहीर अब्बास (१९८२-८३) तर न्यूझीलंडचा टॉम लॅथम (२०१८-१९) यांनी प्रत्येकी ३ वेळी अशी कामगिरी केली आहे.

बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’.

 

 

Leave a Comment