दक्षिण आफ्रिका सीरिजसाठी राहुल द्रविड नाहीतर ‘हा’ असणार टीम इंडियाचा कोच BCCI ने केलं शिक्कामोर्तब

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – आयपीएल 2022 संपल्यानंतर टीम इंडिया लगेचच दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 5 टी-20 मॅचची सीरिज खेळणार आहे. तसेच या सीरिजवेळीच टीम इंडिया इंग्लंडलाही रवाना होणार आहे. त्यामुळे या दोन्ही सीरिजसाठी टीम इंडियाला दोन वेगवेगळ्या टीम तयार कराव्या लागणार आहेत. राहुल द्रविड टेस्ट टीमसोबत इंग्लंडला जाणार असल्यामुळे दक्षिण आफ्रिका सीरिजसाठी टीम इंडियाचा कोच कोण असेल? हा प्रश्न निर्माण झाला होता. तेव्हा विविएस लक्ष्मण याचे नाव आघाडीवर होते. त्यामुळे आता दक्षिण आफ्रिका आणि आयर्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाचा लक्ष्मण असणार आहे यावर बीसीसीआयने (BCCI) शिक्कामोर्तब केले आहे.

शिखर धवन कर्णधार?
खेळाडूंवरील वर्कलोड मुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सीरिजसाठी सीनियर खेळाडूंना आराम दिला जाणार आहे. त्यामुळे चेतन शर्मा यांच्या नेतृत्वातली निवड समिती युवा खेळाडूंना संधी देईल. याशिवाय आयपीएलमध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेल्या हार्दिक पांड्या आणि दिनेश कार्तिक याचे देखील टीममध्ये कमबॅक होऊ शकते. या दोघांनी आपल्या कामगिरीने सगळ्यांना प्रभावित केले आहे. तर शिखर धवनला कॅप्टन्सी दिली जाण्याची शक्यता आहे. मागच्यावर्षी टीम इंडिया इंग्लंडमध्ये असताना भारताची एक टीम श्रीलंका दौऱ्यावर गेली होती, तेव्हा शिखर धवनने त्या टीमचे नेतृत्व केले होते.

या खेळाडूंना आराम
रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल, जसप्रीत बुमराह आणि ऋषभ पंत यांना दक्षिण आफ्रिका सीरिजसाठी आराम दिला जाऊ शकतो. मात्र हे सगळे खेळाडू इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना होणार आहेत. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सीरिजसाठी ऋतुराज गायकवाड, इशान किशन, उमरान मलिक आणि जितेश शर्मा यांच्या नावाचाही विचार केला जाऊ शकतो. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात 9 जून ते 19 जून दरम्यान 5 टी-20 मॅचची सीरिज खेळवण्यात येणार आहे.

हे पण वाचा :

आईच्या मृत्यूनंतर विरह सहन न झाल्याने 25 वर्षीय तरुणाची आत्महत्या

शरद पवार यांना धमकीचे ट्विट

KKR चा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स दुखापतीमुळे उर्वरित IPL मधून बाहेर

NIA ची मोठी कारवाई : डी गँगच्या दोघा जणांना अटक

एक दिवस औरंगजेबाच्या भक्तांना त्याच कबरीत जावे लागेल…, संजय राऊतांचा ओवेसींवर हल्लाबोल

Leave a Comment