IND vs SL 1st T20 : युजवेंद्र चहल श्रीलंकेविरुद्ध रचू शकतो ‘हा’ मोठा विक्रम

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – उद्यापासून भारत आणि श्रीलंका यांच्यातील दौऱ्याला सुरुवात होणार आहे. या भारत दौऱ्यात श्रीलंका टीम इंडिया विरुद्ध (IND vs SL 1st T20) टी 20 आणि एकदिवसीय मालिका खेळणार आहे. या मालिकेतील (IND vs SL 1st T20) पहिला सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये पार पडणार आहे. या मालिकेत सिनिअर खेळाडूंना विश्रांती देण्यात आल्यामुळे हार्दिक पंड्या टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे.

या मालिकेमध्ये (IND vs SL, 1st T20) टीम इंडियाचा फिरकी गोलंदाज युझवेंद्र चहलला एक मोठा विक्रम करण्याची संधी आहे. चहलला टी 20 मध्ये भारतीय म्हणून सर्वाधिक विकेट्सचा विक्रम करण्याची संधी आहे. टी 20 सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम सध्या भुवनेश्वरच्या नावावर आहे. भुवनेशवरच्या नावावर 90 विकेट्सची नोंद आहे. तर चहलच्या नावे 87 विकेट्स आहेत. श्रींलका विरुद्ध टीम इंडिया 3 टी 20 सामने खेळणार आहे. या (IND vs SL, 1st T20) सामन्यात जर चहलने 4 विकेट घेतल्या तर तो भुवनेश्वरचा विक्रम मोडून सर्वाधिक विकेट घेणारा खेळाडू ठरू शकतो.

टी-20 सीरिजसाठी टीम इंडिया
हार्दिक पंड्या (कर्णधार), सूर्यकुमार यादव (उप-कर्णधार), ईशान किशन, ऋतुराज गायकवाड, शुबमन गिल, दीपक हुड्डा, राहुल त्रिपाठी, संजू सॅमसन, वॉशिंगटन सुंदर, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, अर्शदीप सिंह, उमरान मलिक, शिवम मावी आणि मुकेश कुमार.

टी 20 आणि वनडे सीरिजसाठी टीम श्रीलंका
दसुन शनाका (कर्णधार), पथुम निशांका, अविश्का फर्नांडो, सदीरा समरविक्रमे, कुशल मेंडिस (उपकर्णधार एकदिवसीय मालिका), भानुका राजपक्षे (फक्त टी 20 मालिकेसाठी), चरिथ असालंका, धनंजय डि सिल्वा, वानिंदु हसारंगा (उपकर्णधार, टी 20 मालिका), आशेन बांद्रा, महीष तिक्षाणा, जेफरी वेंडरसे (फक्त एकदिवसीय मालिका), चमिका करुणारत्ने, दिलशान मधुशंका, कसुन रजिथा, नुवांदु फर्नांडो (फक्त एकदिवसीय मालिका), दुनिथ वेल्लागे, प्रमोद मुधशन, लाहिरु कुमारा आणि नुवान तुशारा (फक्त टी 20 सीरिजसाठी).

हे पण वाचा :
बिहारमध्ये आणखी मोठी राजकीय उलथापालथ होणार; प्रशांत किशोर यांचं भाकीत
Airtel च्या ‘या’ प्लॅनमध्ये फ्री मध्ये मिळवा Amazon Prime चे सब्सक्रिप्शन !!!
‘धर्मवीर’ चित्रपटाबाबत केदार दिघेंचं मोठं विधान; म्हणाले कि…
Atal Pension Yojana द्वारे रिटायरमेंटनंतर मिळवा खात्रीशीर पेन्शन !!!
दहीहंडीचा समावेश आता क्रीडा प्रकारात होणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा ऐतिहासिक निर्णय