सातारा प्रतिनिधी : शुभम बोडके
कोरोनामुळे शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात आली. त्यामुळे शाळेतील विद्यार्थ्याना ऑनलाईन शिक्षण दिले जाऊ लागले. आता ऑनलाईन शिक्षणानंतर सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील वडगाव या ठिकाणी “घरोघरी शाळा” या उपक्रमाअंतर्गत नवीन शैक्षणिक वर्षात इयत्ता पहिलीत प्रवेश घेतलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी घरातच शाळा हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. या उपक्रमचे नुकतेच सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी उद्घाटन केले.
“घरोघरी शाळा” या उपक्रमाअंतर्गत घेण्यात आलेल्या उदघाटन कार्यक्रमास वडगाव गावचे सुपुत्र व वर्धा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन ओबासे प्रमुख उपस्थित होते. विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी सुरु करण्यात आलेल्या या अभिनव उपक्रमाचा ग्रामीण भागातील विद्यार्थ्याना चांगला फायदा होणार आहे.
पहिलीत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून माण तालुक्यातील वडगाव येथील शिक्षक शिक्षक संजय खरात यांनी वडगावात हा अभिनव उपक्रम सुरु केला आहे. ते गावात गेल्या दीड वर्षापासून घरोघरी शाळा हा उपक्रम उपक्रम राबवित आहेत. त्यांच्या या उपक्रमाची दखल घेत सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौडा यांनी वडगावला भेट दिली. तसेच या उपक्रमाचे कौंतुक केले. व अशा उप्रकारचा उपक्रम राज्याला दिशा देणारा ठरत असल्याचे म्हंटले.