भारत-ADB करार: 13 राज्यांमध्ये आरोग्य सेवा सुधारण्यासाठी 22 अब्ज रुपयांचे कर्ज मंजूर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । केंद्र सरकार आणि एशियन डेव्हलपमेंट बँक म्हणजेच ADB ने भारतातील 13 राज्यांतील शहरी भागात प्राथमिक आरोग्य सेवा बळकट आणि सुधारण्यासाठी $30 कोटी (रु. 22.12 अब्ज) च्या कर्ज करारावर स्वाक्षरी केली आहे. सुमारे 25.6 कोटी शहरी रहिवाशांना या कराराचा लाभ अपेक्षित आहे, त्यापैकी 5.1 कोटी झोपडपट्टी भागातील आहेत.

भारतासाठी या करारावर आर्थिक व्यवहार विभागाचे अतिरिक्त सचिव रजत कुमार मिश्रा यांनी स्वाक्षरी केली तर ADB च्या भारत निवासी मिशनचे देश संचालक ताकेओ कोनिशी यांनी ADB साठी स्वाक्षरी केली.

या कर्ज करारावर स्वाक्षरी केल्यानंतर मिश्रा म्हणाले की,”हा कार्यक्रम भारतातील आयुष्मान भारत हेल्थ अँड वेलनेस सेंटर (AB-HWC) आणि प्रधानमंत्री आत्मनिर्भर स्वस्थ भारत योजना (PM-ASBY) यासारख्या भारताच्या आरोग्य उपक्रमांना सपोर्ट देतो – ज्याचे नाव पंतप्रधान आयुष्मान इंडिया हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर मिशन ( PM-ABHIM) ठेवण्यात आले आहे.”

2018 मध्ये लाँच करण्यात आलेल्या आयुष्मान भारत कार्यक्रमाचे उद्दिष्ट भारतातील सार्वत्रिक आरोग्य कव्हरेज मिळवण्यासाठी प्राथमिक आरोग्य सेवांमध्ये प्रवेश सुधारण्याचे आहे. कोरोना विषाणूच्या साथीच्या प्रसारामुळे, देशाच्या आरोग्य यंत्रणेवर अतिरिक्त दबाव आला आणि सरकारने भविष्यातील साथीच्या रोग आणि इतर आपत्कालीन परिस्थितींसाठी तयारी करण्यासाठी PM-ASBY लाँच केले.

कोनिशी म्हणाले, “भारताच्या आरोग्य व्यवस्थेसाठी कोरोनाव्हायरस या साथीच्या रोगामुळे निर्माण झालेल्या आव्हानांमध्ये नॉन-COVID-19 प्राथमिक आरोग्य सेवेसाठी समान प्रवेश सुनिश्चित करणे महत्वाचे आहे.” हा कार्यक्रम आंध्र प्रदेश, आसाम, छत्तीसगड, गुजरात, हरियाणा, झारखंड, कर्नाटक, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान, तामिळनाडू, तेलंगणा आणि पश्चिम बंगालच्या शहरी भागात राबविण्यात येणार आहे.

Leave a Comment