कहर कोरोनाचा! देशातील कोरोना रुग्णांची संख्या ४० लाखांवर

0
47
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । भारतात कोरोना महामारीने गंभीर स्वरुप धारण केलं आहे. दिवसेंदिवस प्रचंड प्रमाणात नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळत आहेत. गेल्या २ आठवड्यापासून देशात दर दिवशी ७० हजाराच्या वर रुग्ण आढळत आहेत. दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार देशात गेल्या २४ तासांमध्ये ८६ हजार ४३२ नव्या रुणांची नोंद झाली असून १ हजार ८९ रुग्णांचा मृत्यू झाला. तर देशात एकूण ४० लाख २३ हजार १७९ नागरिकांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर ६९ हजार ५६१ रुग्णांचा कोरोना विषाणूने बळी घेतला आहे असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे.

अशा गंभीर प्रसंगी दिलासा देणारी बाब म्हणजे देशात ज्या वेगात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे, त्याहूनही अधिक वेगात रुग्ण कोरोनावर मात करत आहेत. सध्या देशात ८ लाख ४६ हजार ३९५ रुग्णांवर उपचार सुरू असून ३१ लाख ७ हजार ५६१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोना रुग्णांचा वाढता आकडा पाहता कोरोनावर प्रभावीपणे नियंत्रण आणण्यासाठी तसंच राज्यातील प्रत्येक व्यक्तीला आरोग्य शिक्षण देण्यासाठी राज्य सरकारच्यावतीने माझे कुटुंब, माझी जबाबदारी अशी खास नवी मोहीम राबण्यात येणार आहे. ही मोहीम पहिल्या टप्प्यात १५ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर दरम्यान तर दुसऱ्या टप्प्यात १२ ऑक्टोबर ते २४ ऑक्टोबर या कालावधीत राबविण्यात येणार आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here