भारत ‘या’ देशांना निम्म्या किंमतीत करतो पेट्रोल आणि डिझेलची निर्यात ! नक्की प्रकरण काय आहे जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की, भारत हा एक मोठा आयातदार तसेच पेट्रोलियम उत्पादनांचा मोठा निर्यातदार आहे. आपण आपल्या स्वतःच्या आणि निर्यातीच्या गरजांसाठी कच्चे तेल आयात करतो आणि ते शुद्ध करतो तसेच अमेरिका, इंग्लंड आणि चीनसह अनेक देशांमध्ये निर्यात करतो. ही निर्यात भारतातील या पदार्थांच्या किरकोळ किमतीच्या जवळपास निम्म्या दराने होते. सध्या किरकोळ बाजारात पेट्रोलने प्रतिलिटर 110 रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. तीच स्थिती डिझेलची आहे. या दोन पदार्थांवर राज्य आणि केंद्र सरकार मिळून सुमारे 100 टक्के टॅक्स वसूल करतात.

2018 मध्ये माहितीच्या अधिकाराखाली मिळालेल्या माहितीनुसार, त्यावेळी भारत 15 देशांना 34 रुपये प्रति लिटर दराने पेट्रोल तर 29 देशांना 37 रुपये प्रति लिटर दराने डिझेल निर्यात करत होता. इंडिया टुडे वेबसाइटनुसार, भारत सरकार आणि राज्य सरकारांनी किरकोळ पेट्रोलियम उत्पादनांवर जबरदस्त टॅक्स लादले आहेत, ज्यामुळे देशांतर्गत बाजारात त्यांच्या किंमती खूप जास्त आहेत.

हे उत्तर सरकारच्या मंगलोर रिफायनरी अँड पेट्रोकेमिकल्स लिमिटेडकडून RTI द्वारे मिळाले आहे. त्यानुसार 1 जानेवारी 2018 ते 30 जून 2018 या कालावधीत येथून हाँगकाँग, मलेशिया, मॉरिशस, सिंगापूर आणि यूएई येथे रिफाइंड पेट्रोलियम पदार्थांची निर्यात करण्यात आली. त्यावेळी पेट्रोल 32-34 रुपये लिटर तर डिझेल 34-36 रुपये लिटर दराने निर्यात होत होते. त्यावेळी देशातील किरकोळ बाजारात पेट्रोलचा दर 70 रुपये तर डिझेल 60 रुपये लिटर होता.

भारत निर्यात का करतो ?
आपल्या सर्वांना माहीत आहे की, भारत हा जगातील कच्च्या तेलाचा सर्वात मोठा आयातदार देश आहे. देशात कच्च्या तेलाचे शुद्धीकरण करण्यासाठी सरकारी तसेच खाजगी क्षेत्रातील बहुराष्ट्रीय स्तरावरील कंपन्या आहेत. आंतरराष्ट्रीय स्तराच्या तुलनेत या कंपन्यांमध्ये कच्च्या तेलाच्या शुद्धीकरणाचा खर्चही कमी आहे. त्यामुळे भारतही रिफाइंड पेट्रोल आणि डिझेलची लक्षणीय निर्यात करतो. भारताला मिळालेल्या या उत्पन्नामुळे देशात मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधीही निर्माण झाल्या आहेत.

जगातील टॉप 10 देशांमध्ये भारताचा समावेश आहे
भारतातून निर्यात होणाऱ्या वस्तूंमध्ये रिफाइन्ड पेट्रोलियम प्रॉडक्ट्स दुसऱ्या क्रमांकावर आहेत. एवढेच नाही तर रिफाइन्ड पेट्रोलियम उत्पादनांच्या निर्यातीच्या बाबतीत भारताचा जगातील टॉप 10 देशांमध्ये समावेश आहे. भारत अमेरिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया तसेच इराक आणि यूएई सारख्या तेल उत्पादक देशांना शुद्ध पेट्रोलियम उत्पादनांची निर्यात करतो.

100% कर
निर्यात केलेल्या रिफाइन्ड पेट्रोलियम उत्पादनांची किंमत जागतिक पुरवठा आणि मागणीच्या आधारावर निर्धारित केली जाते. यामध्ये तेल कंपन्यांची भूमिका विशेष नाही. दुसरीकडे, देशांतर्गत बाजारात विकल्या जाणार्‍या पेट्रोल आणि डिझेलवर सरकारने लादलेल्या करामुळे त्याची किंमत वाढते. या उत्पादनांवर राज्ये आणि केंद्र सरकारचा टॅक्स समाविष्ट केल्यास तो जवळपास 100 टक्के आहे. म्हणजेच, किरकोळ बाजारात पेट्रोलची किंमत आज 110 रुपये प्रति लीटर असेल, तर याचा अर्थ आजपर्यंत शुद्धीकरणानंतर पूर्ण तयार झालेल्या पेट्रोलची एकूण किंमत सुमारे 55 रुपये प्रति लिटर आहे.

Leave a Comment