योगी आदित्यनाथ यांच्या वक्तव्यावर नेपाळचे पंतप्रधान भडकले; दिला ‘हा’ इशारा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बुधवारी पुन्हा एकदा नेपाळी पंतप्रधान के.पी.शर्मा ओली यांनी कालापानी, लिपूलेख आणि लिम्पियाधुरा हे भूभाग परत घेण्याच्या आपल्या वक्तव्याचा पुनरुच्चार केला. नेपाळच्या संसदेमध्ये बोलताना त्यांनी काली नदीच्या सीमारेषेस मानण्यास नकार दिला आहे. काली नदी ही भारत आणि नेपाळ मधील सीमारेषा मानली जाते. कालापानी, लिपूलेख आणि लिम्पियाधुरा या आपल्या प्रदेशांवर भारताने अतिक्रमण केलेय असे ओली यांचे म्हणणे आहे. त्यासाठी त्यांनी आपल्या नेपाळच्या नव्या नकाशात हे भाग नेपाळमध्ये असल्याचे याआधीच दाखवले आहेत.

यावेळी पंतप्रधान ओली यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावरही टीकास्त्र सोडले. ‘ तिबेटने केली तशी चूक नेपाळने करु नये’ असे काहीसे विधान योगीं आदित्यनाथ यांनी नुकतेच केलेले होते. ‘हा नेपाळच्या सार्वभौमत्वाला कमी लेखण्याचा प्रकार आहे’ असे ओली यावेळी म्हणाले.

“भारताने बनावट काली नदी दाखवून नेपाळचा प्रदेश बळकावला असून तिथे आपले लष्कर तैनात केले आहे. पण हा प्रदेश परत मिळवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. या मुद्दावर संपूर्ण देश एक आहे. सभागृहात विविध पक्षीयांनी एकजूट दाखवण्याची ही दुर्मिळ बाब आहे” असे ओली म्हणाले.

‘भारत आणि नेपाळ हे दोन वेगळे देश असले तरी त्यांचा आत्मा हा एकच आहे तसेच भारत आणि नेपाळ या दोन्ही देशांमध्ये सांस्कृतिक, ऐतिहासिक संबंध आहेतच पण पौराणिक दृष्टीनेही ते एकमेकांशी जोडले गेलेले आहेत हे नेपाळने लक्षात ठेवावे त्यामुळे तिबेटने केली ती चूक नेपाळने करु नये.’ असे योगी आदित्यनाथ म्हणाले होते. एका वृत्तसंस्थेने याबाबतचे वृत्त दिले होते. त्यावर नेपाळचे पंतप्रधान ओली यांनी ‘भारताच्या केंद्रीय नेतृत्वाने योगी आदित्यनाथ यांना नेपाळला धमकावण्याची भाषा करु नका, हा सल्ला द्यावा’ असे म्हटले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment