देशात मागील 24 तासात 96 हजार नव्या रुग्णांची भर; 446 जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : देशात करोना चा कहर दिवसेंदिवस वाढतो आहे त्यामुळे आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे. देशातील राज्यांनी सुरक्षेच्या पातळीवर काही ठिकाणी अंशतः तर काही ठिकाणी पूर्ण लॉक डाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. देशात मागील 24 तासात तब्बल 96 हजार 982 नव्या करोना बाधित रुग्णांची वाढ झाली आहे. तर मागील 24 तासात 446 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

नव्यानं वाढलेल्या कोविड रुग्णांमुळे आतापर्यंत कोरोना रुग्णांची संख्या 1,26,86,049 वर जाऊन पोहचली आहे. तरी कोरोना मुळे आतापर्यंत देशात एक लाख 65 हजार 547 जणांचा मृत्यू झाला आहे. तर सध्या देशात कोरोनावर उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 7,88,223 इतकी आहे.

सोमवारी 50,143 जणांना डिस्चार्ज

कोरोना वर उपचार करून सोमवारी 50,143 रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. याबरोबरच कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची आतापर्यंतची संख्या ही 1कोटी 17 लाख 32 हजार 279 इतकी झाली आहे.

आयसीएमआर न दिलेल्या आकडेवारीनुसार सोमवारी( 5एप्रिल ) 12,11,612 जणांचे स्वॅब तपासण्यात आले. तर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार देशात आतापर्यंत 8,31,10,926 जणांना कोरोनाची ची लस देण्यात आली आहे.

 

You might also like