वेस्ट इंडिजविरुद्धच्या T20 मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर; कोणाला मिळाली संधी तर कोणाला मिळाला डच्यू ?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच BCCIने वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी (T20 series against West Indies) T20 संघाची घोषणा केली आहे. विराट कोहलीला टी-20 संघातून (T20 series against West Indies) वगळण्यात आले आहे. त्याचबरोबर केएल राहुल आणि रविचंद्रन अश्विन यांचे संघात पुनरागमन झाले आहे. गेल्या वर्षी न्यूझीलंडविरुद्धच्या घरच्या टी-20 मालिकेनंतर अश्विनने एकही टी-20 सामना खेळलेला नव्हता. तर केएल राहुल दुखापतीमुळे राहुल संघाबाहेर होता.

वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी (T20 series against West Indies) रोहित शर्मा कर्णधार असेल. त्याचबरोबर जसप्रीत बुमराह आणि युझवेंद्र चहल यांना विश्रांती देण्यात आली आहे. चहलच्या जागी अश्विनचा टीममध्ये समावेश करण्यात आला आहे. याशिवाय जलदगती गोलंदाज उमरान मलिकलाही संघातून वगळण्यात आले आहे. अर्शदीप सिंगचे टी-20 संघात पुनरागमन झाले आहे.

अर्शदीपने इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या T20 मध्ये शानदार गोलंदाजी केली. मात्र, दुसऱ्या आणि तिसऱ्या T20 साठी त्याला संघात स्थान देण्यात आले नव्हते. आता कर्णधार रोहितने पुन्हा एकदा त्याच्यावर विश्वास दर्शवला आहे. भारतीय संघाने मागच्या 18 टी-20 सामन्यांमध्ये 25 हून अधिक खेळाडूंना आजमावले आहे. टी-20 विश्वचषक डोळ्यासमोर ठेवून निवडकर्त्यांना प्रत्येकाला संधी द्यायची आहे.

वेस्ट इंडिजविरुद्धच्या T20 मालिकेसाठी (T20 series against West Indies) भारतीय संघ खालीलप्रमाणे
रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, श्रेयस अय्यर, दिनेश कार्तिक, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, भूवनेश्वर कुमार, आवेश खान, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग.

हे पण वाचा :
महाराष्ट्र नाही तर आता ‘या’ राज्यात मिळेल महाग पेट्रोल

शिंदे- फडणवीसांचा पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत मास्टरस्ट्रोक : घेतले ‘हे’ 9 महत्वाचे निर्णय

Corona चा नवीन BA.5 व्हेरिएन्ट आधीपेक्षा जास्त घातक आहे ???

सध्याच्या जोखमीच्या काळात सोन्यामध्ये गुंतवणूक करावी की नाही ???

ICICI Bank कडून FD वरील व्याज दरात वाढ !!!

Leave a Comment