‘या’ आहेत भारतातील सर्वात 5 सुरक्षित कार ज्यांची किंमत 10 लाखांपेक्षा कमी आहे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कार खरेदी करताना काही गोष्टी लक्षात ठेवणे फार महत्वाचे आहे. विशेषत: त्याची किंमत आणि सुरक्षिततेबद्दल. आजकाल लोक सुरक्षेबद्दल खूपच जागरूक झाले आहेत, म्हणूनच, भारतातील कार उत्पादक कंपन्याही याकडे खूप लक्ष देत आहेत आणि जागतिक सुरक्षिततेचे निकष पूर्ण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. जर तुम्हाला कमी किंमतीत सुरक्षित कार हवी असेल तर आम्ही तुम्हाला सांगूया त्या कोणत्या कार आहेत जे तुमच्यासाठी 10 लाखपेक्षा कमी किंमतीत अधिक चांगल्या आहेत.

1. Mahindra XUV300
सर्वात सुरक्षित कारच्या यादीतील पहिली कार महिंद्रा एक्सयूव्ही 300 आहे. या प्राइस ब्रॅकेटमध्ये ही नवीन कार आहे. सुरक्षेच्या दृष्टीने महिंद्रा एक्सयूव्ही कॉम्पॅक्ट एसयूव्हीला एनसीएपीने 5-स्टार रेटिंग दिले आहे. तसेच, चाइल्ड सेफ्टीच्या दृष्टीने महिंद्रा एक्सयूव्ही 300 4-तारा रेटिंग मिळविणारी पहिली भारतीय कार आहे. महत्त्वाचे म्हणजे कोणत्याही 5-तारा रेटिंग केलेल्या कारसाठी साइड इफेक्ट्सची कार्यक्षमता अत्यंत लक्षात येण्यासारखी आहे.

Mahindra XUV300 achieves five stars and highest combined #SaferCarsForIndia result to date

 

2. Tata Altroz
टाटा अल्ट्रोज कारला 5-स्टार रेटिंग प्राप्त झाले आहे आणि चाइल्ड सेफ्टीच्या दृष्टीने एनसीएपी कडून त्यांना 3-स्टार रेटिंग मिळाली आहे. अल्ट्रोजला समोरच्या बाजूला 2 एअरबॅग्ज येतात. त्याची रचना आणि फुटवेल क्षेत्र देखील स्थिर रेट केलेले आहे. त्याचवेळी, मोठ्या लोकांच्या दृष्टिने डोके आणि मानेला चांगले संरक्षण देखील आहे. तुमच्या छातीला सुद्धा चागले संरक्षण दिल आहे.

TATA’s second five star car

3. Tata Nexon
टाटा मोटर्सची टाटा अल्ट्रोस ही एकमेव कार नाही जी भारतातील सर्वात सुरक्षित कार आहे. टाटा मोटर्सच्या नेक्सनला सुरक्षेच्या दृष्टीने 5-स्टार रेटिंग प्राप्त झाले आहे. ही कार कारमध्ये बसलेल्यांच्या डोक्याला आणि गळ्याला चांगले संरक्षण देते. पेडलच्या विस्थापनामुळे, हे पायांसाठी थोडेसे असुरक्षित असू शकते.

Global NCAP's first five star car in India: the Tata Nexon

4. Tata Tiago/Tigor
टाटा मोटर्सच्या चार कार आहेत ज्यांना सुरक्षेच्या दृष्टीने चांगले रेटिंग मिळाली आहे आणि त्यांची किंमतही 10 लाख रुपयांपेक्षा कमी आहे. टाटा नेक्सन आणि अल्ट्रोस नंतर टाटा टियागो आणि टिगोर सुरक्षेच्या बाबतीत चांगले आहेत. मुलांच्या सुरक्षेच्या बाबतीत या दोन्ही कारला तीन स्टार मिळाले आहेत. टिगोर आणि टियागो दोघांनाही समोरच्या बाजूला दोन एअरबॅग्स आहेत. तसेच, प्रौढ लोकांच्या दृष्टीने डोक्याला आणि मानेला संरक्षण देखील खूप चांगले आहे.

Tata achieves another high rating result with four stars for the Tigor/Tiago

5. Volkswagen Polo
या यादीतील अंतिम कार फोक्सवैगन पोलो आहे. यात व्होक्सवॅगन पोलोला क्रॅश टेस्टमध्ये चार स्टार मिळाले आहेत. जरी, व्होक्सवॅगन जगभरात विकले जाते, परंतु ज्या कारला चार स्टार मिळाले आहेत अशी भारतातील फोक्सवैगनची विशिष्ट कार आहे.

Global NCAP - Indian version of VW Polo sold WITH double airbags scores 4 stars in crash test

ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.

 

Leave a Comment