ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिसऱ्या वनडेत विराटनं मोडला सचिनचा ‘हा’ विक्रम; ठरला पहिला फलंदाज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कॅनबेरा । ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरु असलेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात विराट कोहली (Virat Kohli) नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे. विराटनं एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक वेगानं 12 हजार धावा करण्याचा विक्रम केला आहे. मास्टर ब्लॉस्टर सचिन तेंडुलकरचा विक्रम त्याने मोडला आहे. विराट कोहलीनं केवळ 242 इनिंगमध्ये 12 हजार धावा पूर्ण केल्या आहेत. हा विक्रम आधी सचिनच्या नावे होता. सचिननं 300 इनिंगमध्ये 12 हजार धावा केल्या होत्या.

विराट कोहलीच्या नावे हा देखील विक्रम
विराट कोहली सध्या जगातील नंबर एकचा फलंदाज आहे. विराटच्या नावे सर्वात वेगवान 8000 धावा (175 इनिंगमध्ये), 9000 रन (194 इनिंगमध्ये), 10000 रन (205 इनिंगमध्ये) और 11000 रन (222 इनिंगमध्ये) करण्याचा विक्रम देखील आहे.

एकदिवसीय क्रिकेटमध्ये विराट कोहली हाच मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचे रेकॉर्ड्स तोडू शकतो असं म्हटलं जातं. एकदिवसीय क्रिकेटमध्ये धावांच्या बाबतीत केवळ सचिन तेंडुलकर (18, 426), कुमार संगकारा (14,234), रिकी पॉन्टिंग (13,704), सनथ जयसूर्या (13,430) आणि माहेला जयवर्धने (12,650) हे चारच खेळाडू विराटच्या पुढं आहेत, जे सध्या क्रिकेट खेळत नाहीत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

 

Leave a Comment