India vs New Zealand : रोहितसह 4 दिग्गजांना विश्रांती, रहाणे बनला कर्णधार

नवी दिल्ली । न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे. विराट कोहलीच्या अनुपस्थितीत अजिंक्य रहाणेकडे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. रोहित शर्माला दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे. त्याचबरोबर अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजाराला उपकर्णधारपद देण्यात आले आहे.

कानपूर येथे होणाऱ्या पहिल्या कसोटीत रहाणे संघाचे नेतृत्व करणार आहे. विराट कोहली तीन डिसेंबरपासून मुंबईत होणाऱ्या कसोटीसाठी परतणार आहे. जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि ऋषभ पंत यांना न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे. 25 नोव्हेंबरपासून कानपूरमध्ये पहिला कसोटी सामना सुरू होणार आहे.

ऋषभ पंतच्या अनुपस्थितीत रिद्धिमान साहा यष्टिरक्षणाची जबाबदारी सांभाळेल तर केएस भरत हा या मालिकेतील दुसरा यष्टिरक्षक असेल. आंध्र प्रदेशातील 28 वर्षीय भरत इंडियन प्रीमियर लीगमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगलोरकडून खेळला आहे. या वर्षी इंग्लंडविरुद्धच्या घरच्या कसोटी मालिकेसाठी तो पाच स्टँडबाय खेळाडूंपैकी एक होता.

17 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या न्यूझीलंडविरुद्धच्या होम सीरिजपूर्वी BCCI नवीन कोचिंग स्टाफची घोषणा करू शकते. विक्रम राठोड फलंदाजी प्रशिक्षक, टी दिलीप क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आणि पारस म्हांबरे गोलंदाजी प्रशिक्षक असतील. सध्याचे फलंदाजी प्रशिक्षक राठोड त्यांच्या पदावर कायम राहू शकतात.

न्यूझीलंड कसोटी मालिकेसाठीचा भारतीय संघ: अजिंक्य रहाणे (कर्णधार), केएल राहुल, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा (उपकर्णधार), शुभमन गिल, श्रेयस अय्यर, ऋद्धिमान साहा (WK), केएस भरत (WK), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, जयंत यादव, इशात शर्मा, उमेश यादव, मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा.

You might also like