Sunday, May 28, 2023

श्रीलंका दौऱ्यामध्ये ‘हा’ खेळाडू असावा टीमचा कर्णधार दीपक चहरने व्यक्त केली इच्छा

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – टीम इंडियाचे वरिष्ठ खेळाडू पुढील महिन्यात इंग्लंडच्या दौऱ्यावर जाणार आहे. याचदरम्यान युवा खेळाडूंची एक टीम श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. तेव्हा या टीमचा कर्णधार कोण असणार यावर चुरस निर्माण झाली आहे. कर्णधारच्या शर्यतीत शिखर धवन,श्रेयस अय्यर,हार्दिक पांड्या,भुवनेश्वर कुमार यांच्या नावाची चर्चा आहे. यामध्ये आता टीम इंडियाचा जलदगती गोलंदाज दीपक चहर याने शिखर धवनने टीमचे नेतृत्व करावे अशी इच्छा व्यक्त केली आहे.

काय म्हणाला दीपक चहर
‘शिखर धवन बऱ्याच काळापासून क्रिकेट खेळत आहे, त्याच्याकडे अनुभवसुद्धा आहे, त्यामुळे कर्णधार म्हणून तो चांगला पर्याय आहे. सगळे खेळाडू धवनची इज्जत करतात आणि त्याचं ऐकतातसुद्धा असे दीपक चहरने एका मुलाखतीमध्ये म्हणले आहे. तसेच ‘मला माझ्यावर विश्वास आहे, मी श्रीलंका दौऱ्यासाठी तयार आहे. माझी श्रीलंका दौऱ्यात चांगली कामगिरी करण्याची अपेक्षा आहे. तसेच आयपीएलमध्येही मी चांगली बॉलिंग केली आहे आणि मी चांगल्या फॉर्ममध्ये आहे. श्रीलंकेत खेळण्यासाठी मी उत्साही आहे. आमची ही टीम सिनियर टीमप्रमाणेच मजबूत दिसत आहे. आमच्याकडे खूप पर्याय उपलब्ध आहेत असे वक्तव्य दीपक चहरने केले आहे.

श्रीलंका दौऱ्यासाठी टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी राहुल द्रविड यांच्यावर सोपवण्यात आली आहे. राहुल द्रविड सध्या एनसीएचा प्रमुख आहे. रवी शास्त्रीच्या गैरहजेरीमध्ये राहुल द्रविड टीम इंडियाच्या प्रशिक्षकाची जबाबदारी पार पाडणार आहे. राहुल द्रविडकडे प्रशिक्षकपदाचा चांगला अनुभव आहे, त्याने आधी इंडिया-ए आणि भारताच्या अंडर-19 टीमचा प्रशिक्षक म्हणून याआधी काम केले आहे.