मुंबई कसोटीत भारताचा विजय; 372 धावांनी न्यूझीलंडला लोळवले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुंबई येथील दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने न्यूझीलंडचा 372 धावांनी पराभव करत दिमाखदार विजय मिळवला आहे. मयंक अग्रवालचे शतक, आणि भारतीय फिरकीपटूची दमदार कामगिरी हे या कसोटी सामन्याचे वैशिष्ट्य ठरले.

आज चौथ्या दिवसाची सुरुवात होण्यापूर्वी भारताला विजयासाठी फक्त 5 बळींची गरज होती. पाहिल्या तासातच भारतीय गोलंदाजांनी किवी फलंदाजांना बाद करत दणदणीत विजय मिळवला. भारताकडून आर अश्विन आणि जयंत यादव आणि प्रत्येकी 4 बळी घेतले तर अक्षर पटेल ने 1 विकेट घेतली. न्यूझीलड कडून डार्लिं मिचेल ने सर्वाधिक 60 धावा काढल्या.

दरम्यान, पहिल्या डावात मयांक आगरवाल च्या शतकी खेळीच्या जोरावर भारताने मोठी आघाडी घेतली होती. त्यातून किवी संघ सावरलाच नाही. अखेर भारतीय फिरकीपटूपुढे न्यूझीलंड फलंदाजी पुरती कोसळली.

You might also like