एक लाख रुपयाची गाय केवळ एक हजारात विकतेत भारतीय सेना

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। डेअरी मध्ये नफा मिळविणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आता एक उत्तम संधी भारतीय सेना घेऊन आली आहे. एका उत्तम जातीच्या गाईला विकण्याची तयारी सेना करते आहे. आणि विशेष म्हणजे एक लाख किंमत असणारी ही गाय केवळ १ हजार रुपयात सेना विकत आहे. ही किंमत अगदीच किरकोळ आहे.फ्रिसवाल जातीची ही गाय आहे. आणि भारतीय सेनेकडे या गायी मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत.  साधारण २५०० गायी सध्या सैन्याकडे आहेत.

मागच्या वर्षी औदस्त मध्ये भारतीय सेनेने ३९ शेते बंद करण्याचा निर्णय घेतला होता आणि त्यानंतर त्यांनी आपल्या गायी विकण्याचा देखील निर्णय घेतला होता. त्यावेळी त्यांच्या गायींसाठी कुणी ग्राहकच न मिळाल्याने त्यांच्यासमोर समस्या निर्माण झाली होती. याचे कारण म्हणजे गायींची जास्त असणारी किंमत होती. आता सेनेने गायींची किंमत अगदीच कमी केली आहे. या गायी आता स्टेट डेअरी कोऑपरेटिव्ह आणि इतर विभागांना केवळ १ हजार किंमतीत विकल्या जाणार आहेत. फक्त गायींना विकत घेणाऱ्यांनी त्यांना घेऊन जाण्याचा खर्च करायचा असल्याचे सेनेकडून सांगण्यात आले आहे.

फ्रिसवाल गाय  ही सरासरी ३६०० लीटर दूध देते (दुगधपान कालावधी),  आणि एरवी जवळपास २००० लीटर दूध देते. काही ठराविक फ्रिसवाल गाई अशा आहेत ज्या सरासरी ७००० लीटर दूध देतात. सैन्याकडे एकूण ३९ शेते होती जी बंद करण्यात आली आहेत. मात्र गाई विकल्या गेल्या नसल्यामुळे त्यांचे काम  आहे. देशभरात  मिलिटरी फार्म सन १८८९ मध्ये स्थापित करण्यात आले होते. जवानांना ताजे दूध आणि डेअरी उत्पादने मिळावीत हा याचा हेतू होता.

Leave a Comment