भारतीय खगोलशास्त्रज्ञानेच ‘विक्रम लँडर’चा पत्ता शोधला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
टीम, HELLO महाराष्ट्र | अमेरिकेची अंतराळ संस्था नासानं चांद्रयान-२ मोहिमेबद्दल मोठी माहिती दिली आहे. विक्रम लँडरचे तुकडे सापडल्याचा दावा नासाकडून करण्यात आला आहे. नासाच्या लूनार रेकनेन्सेस ऑर्बिटरनं विक्रम लँडरचा फोटो टिपला आहे. विशेष म्हणजे नासाने हा दावा केला असून तो एका भारतीय इंजिनिरने दिलेल्या माहितीतूनच समोर आलं आहे. चेन्नई येथील ट्विटवर शान नाव असलेल्या षण्मुगा सुब्रमण्यम या युवा इंजिनिअरनेच विक्रम लँडरशी सर्वात प्रथम संपर्क साधला होता.

नासाकडून ट्विट करुन एका फोटो शेअर करण्यात आला आहे. ७ सप्टेंबरला इस्रोचा विक्रम लँडरसोबतचा संपर्क तुटला. त्यानंतर इस्रोनं अनेकदा विक्रमशी संपर्क साधण्याचे प्रयत्न केले. मात्र त्यात इस्रोला अपयश आलं. आता, नासाने विक्रम लँडरचा शोध लागल्याचं सांगितलंय. नासाच्या लूनार रेकनेन्सेस ऑर्बिटरनं (एलआरओ) चंद्राच्या पृष्ठभागावर असलेल्या विक्रम लँडरच्या तुकड्यांचा फोटो प्रसिद्ध केला आहे.

विक्रम लँडर ज्या ठिकाणी उतरणार होतं, त्यापासून ७५० मीटर अंतरावर नासाला त्याचे तुकडे सापडले आहेत. विक्रमचे तीन मोठे तुकडे २*२ पिक्सलचे आहेत. नासानं रात्री दीडच्या सुमारास विक्रम लँडरच्या तुकड्यांचा फोटो प्रसिद्ध केला. लूनार रेकनेन्सेस ऑर्बिटरला विक्रमचे तीन तुकडे दिसल्याची माहिती नासानं ट्विटमधून दिली.

 

Leave a Comment