भारताची ऐतिहासिक कामगिरी ! World Boxing Championshipsच्या फायनलमध्ये पोहोचणारी निखत झरीन ठरली पहिली भारतीय महिला
मुंबई : हॅलो महाराष्ट्र – भारताने आज ऐतिहासिक कामगिरी केली आहे. कारण आतापर्यंत भारताच्या कोणत्याही महिला खेळाडूला वर्ल्ड बॉक्सिंगच्या फायनलमध्ये (World Boxing Championships) मजल मारता आली नव्हती. या मानाच्या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचणारी निखत झरीन हि पहिली भारतीय महिला ठरली आहे. त्याचबरोबर अंतिम फेरीत पोहोचताना आता निखतने रौप्य पदक निश्चित केले आहे. निखतने या स्पर्धेच्या (World Boxing Championships) उपांत्य फेरीत दिमाखदार कामगिरी केली.
निखतने यावेळी 52 किलो वजनी गटामध्ये ब्राझीलच्या कॅरोलिन डी अल्मेडाचा 5-0 असा पराभव केला आणि थेट अंतिम फेरीत स्थान पटकावले आहे. या स्पर्धेच्या अंतिम फेरीत आतापर्यंत एकाही भारताच्या माहिलेला स्थान पटकावता आले नव्हते. पण निखतने हा मान पटकावला आहे. या स्पर्धेच्या अंतिम फेरीत निखतचा सामना आता थायलंडच्या जितमास जितपाँगबरोबर होणार आहे. निखतने जर अंतिम फेरीत विजयी झाली तर या स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणारी ती पहिली भारतीय महिला ठरणार आहे. त्यामुळे आता या स्पर्धेच्या (World Boxing Championships) अंतिम फेरीत निखत कशी कामगिरी करते, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिले आहे.
भारताच्या दोन महिला खेळाडूंचा झाला पराभव
भारताच्या मनिषा आणि परविन यांनी देखील या स्पर्धेच्या (World Boxing Championships) उपांत्य फेरीत प्रवेश केला होता. मात्र या स्पर्धेत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. मनिषाला इटलीच्या इरमा टेस्टाकडून 0-5 असा पराभव स्विकारावा लागला तर परविनला आयर्लंडच्या एमी ब्रॉडहर्स्टकडून 1-4 असा पराभव पत्करावा लागला. निखतने मात्र उपांत्य फेरीत दमदार कामगिरी करत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.
हे पण वाचा :
तुमचा नगरसेवक असलेल्या एखाद्या वॉर्डात फिरुन दाखवा; खासदार जलील यांचे फडणवीसांना आव्हान
कुठे फेडाल ही पाप, वर गेल्यावर तुम्हांला नरकातच जावं लागेल : अजित पवार
…तर मुंबईला 26 जुलैच्या परिस्थितीची आठवण येईल की काय?; नितेश राणेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र
शेवटी भांड्याला भांडे हे लागणारच…; नाना पटोलेंच्या टीकेवर अजितदादांचे प्रत्युत्तर
अजित पवार पहाटेच्या शपथविधीवर कधी बोलणार?; नाना पटोलेंनी अजितदादांना डिवचलं