चक्क क्रिकेट सामन्यादरम्यानच भारतीय चाहत्याने ऑस्ट्रेलियन तरुणीला केलं प्रपोज अन् पुढे…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | तस पाहिलं तर क्रिकेट स्टेडियम हे क्रिकेटर्ससाठी सर्वात सुंदर स्थान आहे, परंतु क्रिकेट मैदानात कोणी कोणाला प्रपोज करून आपलं प्रेम व्यक्त करेल अशी शक्यता थोडी कमीच असते. सिडनी क्रिकेट मैदानावर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसर्‍या वनडे सामन्यात एका भारतीय चाहत्याने ऑस्ट्रेलियन क्रिकेट टीमच्या महिला चाहतीला प्रपोज केलं. आणि आपलं प्रेम व्यक्त केले.

भारतीय टीमची बॅटींग सुरु असताना 21 व्या ओव्हरदरम्यान स्टेडियममध्ये एका भारतीय चाहत्याने ऑस्ट्रेलियाच्या चाहतीला प्रपोज केलं. मुलाने रिंगसह गुडघ्यावर बसून या तरुणीला प्रपोज केलं. त्या मुलीने मुलाला मिठी मारली आणि होय मध्ये उत्तर दिले

ऑस्ट्रेलियन संघाचा अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेलसह सर्व खेळाडूंनी टाळ्या वाजवल्या आणि या सुंदर क्षणाचे स्वागत केले. मुलाची आणि मुलीची बॉडी लँग्वेज पाहिल्यास असे वाटते की दोघे एकमेकांना ओळखतात.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

You might also like