मुंबईचा रोहित जगात भारी!! ‘असा’ विक्रम करणारा जगातील पहिलाच फलंदाज

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | इंग्लंड विरुध्दच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताचा आक्रमक सलामीवीर आणि धडाकेबाज फलंदाज रोहित शर्माने दमदार शतक ठोकत अडचणीत सापडलेल्या भारतीय संघाला सुस्थितीत आणले. विराट, आणि पूजारा माघारी परतल्यानंतर रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे या मुंबईकर जोडीने इंग्लिश गोलंदाजाना चांगकाच घाम फोडला.

भारताने नाणेफेक जिंकल्यावर सलामीला शुबमन गिल आणि रोहित शर्मा हे दोघे आले. गिल शून्यावर माघारी परतला. पण रोहितने मात्र दमदार खेळ सुरू ठेवला. वेगवान आणि फिरकी गोलंदाजांचा वेळोवेळी समाचार घेतला. चेतेश्वर पुजारा आणि कर्णधार विराट कोहली दोघे स्वस्तात बाद झाले, पण मुंबईकर अजिंक्य रहाणेने रोहितला साथ दिली. याच दरम्यान रोहित शर्माने शतकी मजल मारली. त्याचसोबत श्रीलंका, वेस्ट इंडिज, दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड या चारही संघांविरूद्ध सर्व फॉरमॅटमध्ये शतक ठोकणारा रोहित पहिला खेळाडू ठरला.

रोहित शर्माने इंग्लिश गोलंदाजांचा खरपूस समाचार घेत 231 चेंडूत 161 धावा काढल्या. या दरम्यान त्याने 18 चौकार आणि 2 गगनचुंबी षटकार ठोकले. रोहितच्या या दमदार खेळीने भारतीय संघ सुस्थितीत आला.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

You might also like