Commonwealth Games साठी पुरूष हॉकी टीम जाहीर; मनप्रीत सिंहकडे देण्यात आले कर्णधारपद

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारताने सोमवारी कॉमनवेल्थ गेम्ससाठी (Commonwealth Games) पुरूषांचा संघ जाहीर केला आहे. यामध्ये मनप्रीत सिंहकडे कर्णधारपद तर ड्रॅग फ्लीकर हरमनप्रीत सिंहकडे संघाचे उपकर्णधारपद देण्यात आले आहे. हॉकी इंडियाने बर्मिंगहॅम तसेच 2024 पॅरिस ऑलिंपिकच्या पात्रता फेरी तसेच हांगझोऊ आशियाई खेळांसाठी कमी वेळ असल्याने कॉमनवेल्थ गेम्ससाठी (Commonwealth Games) दुसऱ्या श्रेणीची टीम पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनामुळे चीनमध्ये आशियाई खेळ स्थगित करण्यात आले होते. यानंतर आता 28 जुलैला होणाऱ्या या स्पर्धेसाठी (Commonwealth Games) हॉकीचा पुरूषांचा संघ निवडण्यात आला आहे. या स्पर्धेत (Commonwealth Games) भारतीय हॉकी टीमचा पूल बीमध्ये समावेश करण्यात आला आहे. पूल बीमध्ये भारतासोबत इंग्लंड, कॅनडा, वेल्स आणि घाना हे देश असणार आहेत.

मागच्या वर्षी टोकियो ऑलिंपिकमध्ये कांस्य पदक मिळवल्यावर मनप्रीतने अमित रोहिदास यांची जागा घेणार असल्याचे संकेत दिले होते. अमित दास याने बेल्जियम आणि नेदरलँड विरुध्द एफआयएच हॉकी प्रो लीगच्या सामन्यात भारताच्या कर्णधारपदाची धुरा सांभाळली होती. उपकर्णधार असलेल्या हरमनप्रीतने हॉकी प्रो लीगमध्ये जास्त गोल केले होते. कॉमनवेल्थ सामन्यात (Commonwealth Games) भारताचा पहिला सामना घाना या देशाबरोबर होणार आहे.

आम्ही कॉमनवेल्थ गेम्ससाठी (Commonwealth Games) उत्कृष्ट टीम निवडली आहे. या खेळाडूंना एफआयएच हॉकी प्रो लीगच्या सामन्यात तगड्या प्रतिस्पर्ध्यांविरुध्द खेळण्याचा अनुभव आहे. आम्ही बेल्जियम आणि नेदरलँडच्या खेळाचा अभ्यास करणार असल्याचे मुख्य कोच ग्रॅहम रीड यांनी यावेळी सांगितले. या सामन्यात (Commonwealth Games) दुखापतीनंतर गोलकीपर पीआर राजेश कमबॅक करत आहे. तसेच या टीमध्ये कृष्ण बहादूर पाठकचाही समावेश करण्यात आला आहे.

कॉमनवेल्थ गेम्ससाठी भारतीय पुरूष संघ पुढीलप्रमाणे :
गोलकीपर: पीआर श्रीजेश आणि कृष्ण बहादूर पाठक
डिफेंडर: वरुण कुमार, सुरेंद्र कुमार, हरमनप्रीत सिंह(उप कर्णधार), अमित रोहिदास, जुगराज सिंह, जरमनप्रीत सिंह
मिडफील्डर: मनप्रीत सिंह (कर्णधार), हार्दिक सिंह, विवेक सागर प्रसाद, शमशेर सिंह, आकाशदीप सिंह आणि नीलकांत शर्मा.

हे पण वाचा :
धारावीच्या वरिष्ठ पोलिसांनी टाळ मृदुंगाच्या गजरात वारकऱ्यांसोबत धरला ठेका

आम्हाला धोका असेल तर समोरच्यांनाही नाही का?; विधानपरिषद निवडणुकीवरून संजय राऊतांची प्रतिक्रिया

भाजपचे अनेक आमदार माझ्या संपर्कात, पण … ; खडसेंचं मोठं विधान

मुख्यमंत्री पद वाचविण्यासाठी बळी जाणार मिशीवाल्या मावळ्याचा; भाजप नेत्याचे सूचक ट्विट

महिलेला जातीवाचक शिवीगाळ केल्यामुळे करुणा शर्मावर गुन्हा दाखल

Leave a Comment