हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय बाजारात अनेक इलेक्ट्रिक गाड्याची मागणी वाढली आहे. या वाढत्या लोकप्रियतेमुळे विविध नामांकित कंपन्या नवीन मॉडेल्स लाँच करत आहेत. गेल्या दोन दिवसांत एकूण 8 नवीन इलेक्ट्रिक दुचाकी भारतीय बाजारात लाँच करण्यात आल्या आहेत. या लाँचमध्ये ओला इलेक्ट्रिक, होंडा, रिव्हर आणि कोमाकी या प्रमुख कंपन्यांचा समावेश आहे. या गाडीच्या फीचर्समुळे ग्राहकवर्ग मोठ्याप्रमाणात आकर्षित होत आहे.
ओला Gig आणि Gig+ –
ओलाने दोन किफायतशीर मॉडेल्स लाँच केली आहेत. ओला या इलेक्ट्रिक गाडीला बाजारात मोठ्याप्रमाणात मागणी असून , यांनी दोन गाड्या लाँच केल्या आहेत. त्यामध्ये पहिली ओला Gig हि असुन , ग्राहकांना ती 39999 किंमतीत मिळणार आहे. या गाडीचे वैशिष्ट असे आहे कि ती सिंगल चार्जमध्ये 112 किमी रेंज जाऊ शकते. तसेच ओलानेच त्यांची Gig+ लाँच केली आहे. ती दोन बॅटरीसह 157 किमी पर्यंत रेंज जाते . या गाडीची किंमत 49999 रुपये आहे.
ओला S1 Z आणि S1 Z+ –
ओला कंपनीने त्यांच्या इलेक्ट्रिक स्कूटरच्या सीरीजमध्ये दोन आकर्षक मॉडेल्स ओला S1 Z आणि S1 Z+ लाँच केली आहेत. ओला S1 Z ची किंमत 59999 रुपये आहे आणि ती 146 किमी रेंजसह ड्युअल बॅटरी सिस्टमसह येते, ज्यामुळे ती एक उत्कृष्ट पर्याय ठरते. दुसरीकडे ओला S1 Z+ ची किंमत 64999 आहे आणि ती 70 किमी/तासच्या टॉप स्पीडसह आणि 146 किमी रेंजसह येते, ज्यामुळे ती अधिक वेगवान आणि शक्तिशाली अनुभव प्रदान करते.
होंडा ॲक्टिवा E आणि QC1 –
होंडा कंपनीनेही दोन नवीन मॉडेल्स लाँच केली आहेत, होंडा ॲक्टिवा E आणि QC1. ही नवी लाँच केलेली स्कूटर्स आधुनिक डिझाईन आणि कार्यक्षमता यांचा उत्तम संगम म्हणून मानली जातात, ज्यामुळे भारतीय ग्राहकांना विविध पर्याय उपलब्ध होतात. ॲक्टिवा E मध्ये 102 किमी ची रेंज आहे, जे विविध राइडिंग मोड्स आणि टॉप स्पीड 80 किमी/तास यासह अतिशय आरामदायक आणि कार्यक्षम अनुभव देतो. या मॉडेलमध्ये तीन राइडिंग मोड्स उपलब्ध आहेत, जे वापरकर्त्याला वेगवेगळ्या परिस्थितींमध्ये चांगला अनुभव देतात. QC1 हे एक अत्याधुनिक इलेक्ट्रिक स्कूटर आहे, ज्यात 80 किमी रेंज आहे. यामध्ये टीएफटी स्क्रीन आणि जलद चार्जिंगची सुविधा देखील समाविष्ट आहे.
कोमाकी MG Pro Lithium सीरिज –
कोमाकीने 59999 रुपयांपासून सुरुवात करणारी MG Pro लिथियम सिरीज लाँच केली आहे. सिंगल चार्जमध्ये 150 किमी रेंज मिळणारी ही स्कूटर पार्किंग असिस्ट आणि क्रूझ कंट्रोलसह येते.
रिव्हर इंडी –
बेंगळुरू आधारित रिव्हर कंपनीने 1.43 लाख रुपयांच्या किंमतीत इंडी मॉडेल सादर केले आहे. यात चेन ड्राइव्ह सिस्टम, रिव्हर्स स्विच, आणि सुधारित गिअरबॉक्स देण्यात आले आहे.
इलेक्ट्रिक वाहनांची वाढती मागणी –
सध्या भारतात इलेक्ट्रिक वाहनांकडे स्वस्त आणि चांगला पर्याय म्हणून पाहिले जात आहे . या स्कूटर्सच्या विविध किंमती व आकर्षक फीचर्समुळे सामान्य लोकही इलेक्ट्रिक वाहनांकडे वळत आहेत. त्यामुळे बाजारात वाहनांची मागणी वाढलेली आहे.