व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

इंडियन ऑईलने लाँच केला पारदर्शक सिलेंडर, जाणून घ्या काय आहेत वैशिष्ट्ये

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – इंडियन ऑईल कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी हलक्या वजनाचा सिलेंडर नुकताच लाँच केला आहे. हा सिलेंडर हलक्या वजनाचा आणि रंगीत असा असणार आहे. हा सिलेंडर इतर ठिकाणी नेता येणार आहे. तसेच हा सिलेंडर किती शिल्लक आहे हेसुद्धा समजणार आहे. हे सिलेंडर डिझाईन मॉड्यूलर किचनसाठी करण्यात आले आहे.

हा सिलेंडर फायबरपासून बनवण्यात आला आहे. हा सिलेंडर 5 आणि 10 किलोच्या आकारात उपलब्ध होणार आहे. सध्या वापरात असलेल्या गॅस सिलेंडर्सपेक्षा हे सिलेंडर 50 टक्के हलका असणार आहे. हे नवीन प्रकारचे सिलेंडर सध्या हैदराबाद आणि दिल्लीमध्ये उपलब्ध आहेत.

कंपनीने आपल्या ट्विटमध्ये अधिक माहितीसाठी आपण आपल्या जवळच्या इंडेन वितरकाशी संपर्क साधावा असे म्हणले आहे. सध्या घरगुती एलपीजी सिलेंडर हा लोखंडी टाकीतून दिला जात आहे. पण आता हे 5 आणि 10 किलोचे सिलेंडर फायबरपासून बनवण्यात आले आहेत. असे देशात पहिल्यांदाच घडत आहे.

या सिलेंडरची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे :
१) फायबरपासून बनवलेले हे सिलेंडर अत्यंत सुरक्षित असणार आहेत.
२) सिलेंडरचा काही भाग हा पारदर्शक असणार आहे.
३) हे सिलेंडर वजनाला खूप हलके आणि रंगीबेरंगी असणार आहे.
४) ग्राहकांना सिलेंडरमध्ये किती गॅस उरला हे देखील सहजरित्या समजणार आहे.
५) सध्या वापरात असलेल्या गॅस सिलेंडर्सपेक्षा हे सिलेंडर 50 टक्के हलका असणार आहे.
६) फायबरपासून बनवलेल्या या सिलेंडरमध्ये जास्तीत जास्त 10 किलो गॅस भरण्यात येणार आहे.