हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय रेल्वे (Indian Railways) आपल्या प्रवाशांसाठी सतत नवनवीन सुविधा घेऊन येत असते. प्रवास करत असताना प्रवाशांना कोणताही त्रास होऊ नये आणि त्यांना आरामदायी प्रवास अनुभवता यावा यासाठी रेल्वे विभाग सातत्याने प्रयत्नशील असते. मागील काही वर्षांत रेल्वेच्या सेवेत मोठा कायापालट झाला आहे. रेल्वे स्टेशनवर अनेक सुविधा वाढल्या आहेत. आता रेल्वेच्या स्लीपर कोच आणि जनरल कोचमध्ये सुविधा वाढवण्यावर भर दिला जातोय. त्याचाच एक भाग म्हणजे रेल्वेने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. स्लीपर कोचमध्ये AC कोच सारख्या सुविधा देण्याच्या प्रयत्नांकडे रेल्वे विभागाने पहिले पाऊल टाकलं आहे. त्यानुसार, हँडवॉशसंदर्भात रेल्वेने मोठी घोषणा केली आहे.
लांब पल्ल्याच्या स्लीपर कोच डब्यांमध्ये लिक्विड हँडवॉश लावण्याचा निर्णय रेल्वे विभागाने (Indian Railways) घेतला आहे. आता नॉन एसी आरक्षित कोचमध्ये ऑनबोर्ड हाउसकिपिंग सेवेसोबत लिक्विड सोप देण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय रेल्वेच्या मानकांमध्ये सुधारणा करण्यासाठी, बोर्डाने एमआरटीएस आणि एमएफच्या मान्यतेने हा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत ही सुविधा फक्त एसी डब्यांमध्ये दिली जात होती. मात्र आता स्लिपर कोच मधील प्रवाशांनाही त्याचा लाभ घेता येणार आहे. या निर्णयानुसार, स्लीपर कोचच्या वॉशरूम आणि वॉश बेसिन भागात डिस्पेंसर बसवले जातील आणि ट्रेन सुरू होण्यापूर्वी ते लिक्विड हँड वॉशने भरले जातील. प्रवासादरम्यान ते संपल्यास, हँडवॉश लिक्विड पुन्हा भरण्याची जबाबदारी संबंधित अधिकाऱ्याची असेल.
कोणकोणत्या रेल्वेगाड्यांमध्ये मिळणार सुविधा- Indian Railways
हा बदल OBHS सुविधा असलेल्या गाड्यांना लागू होईल. प्रवासादरम्यानही स्वच्छता राखण्यासाठी ही सेवा सुरू करण्यात आली होती आणि आता ती आणखी मजबूत केली जात आहे. OBHS” म्हणजे “On-Board Housekeeping Service” (ऑन-बोर्ड हाऊसकीपिंग सर्व्हिस), ही भारतीय रेल्वेद्वारे लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये (Indian Railways) स्वच्छता आणि प्रवाशांच्या सोयीसाठी प्रदान केलेली सेवा आहे. OBHS सुविधा असलेल्या गाड्यांमध्ये, प्रशिक्षित कर्मचारी गाडीच्या डब्यांची स्वच्छता, शौचालयांची देखभाल, कचरा व्यवस्थापन आणि इतर आवश्यक सेवा प्रवासादरम्यान पुरवतात. या सेवेचा उद्देश प्रवाशांना स्वच्छ आणि आरामदायी प्रवासाचा अनुभव देणे हा आहे. भारतात राजधानी एक्सप्रेस, शताब्दी एक्सप्रेस, दुरंतो एक्सप्रेस. इतर प्रीमियम आणि मेल/एक्सप्रेस गाड्यामध्ये OBHS सुविधा असते.