धक्कादायक !! युक्रेन- पोलंड सीमेवर भारतीय विद्यार्थ्यांना मारहाण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | रशिया आणि युक्रेन मध्ये जोरदार युद्ध सुरू असून हे युद्ध संपण्याची चिन्हे दिसत नाहीत. अनेक ठिकाणी गोळीबार आणि बॉम्ब हल्ले सुरूच असून परिस्थिती अत्यंत भीषण बनली आहे. त्यातच आता युक्रेनमधून पोलंडमध्ये स्थलांतर करत असताना भारतीय विद्यार्थ्यांना बेदम मारहाण झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.

याबाबत एका विद्यार्थीनीने सांगितलं, “आम्ही जेव्हा युक्रेन-पोलंड सीमेवर आलो तेव्हा आम्हाला सुरक्षा रक्षकांनी घेरलं होतं. आम्हाला प्रवेशद्वारावर प्रवेश देण्यात आला नाही. तेथून केवळ युक्रेनच्या नागरिकांना पोलंडमध्ये प्रवेश दिला जात होता. खूप विनवण्या केल्यानंतर केवळ भारतीय मुलींना प्रवेश देण्यात आला. त्यानंतर पोलीस आले आणि त्यांनी भारतीय मुलांना बेदम मारहाण केली.

दरम्यान युक्रेनमध्ये अडकून पडलेल्या एका गुजराती विद्यार्थ्याने सांगितलं की, “आम्हाला युक्रेनच्या लोकांकडून त्यांच्या देशाची सीमा ओलांड्यापासून रोखण्यात आलं. चाळीस किमीची पायपीट करुन आम्ही युक्रेन-पोलंड सीमेवर पोहोचलो, मात्र यावेळी पोलिसांनी आम्हाला मारलं. भारत रशियाच्या बाजूनं असल्यानं आमच्यावर हा हल्ला झाला आहे असे त्या विद्यार्थ्याने सांगितले