खळबळजनक ! पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण संस्थेत देशी दारूचा अड्डा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – पोलीस भरती प्रक्रियेतील परीक्षांमधील घोटाळे उघड झाल्यानंतर आता ठिकठिकाणच्या भरतीपूर्व प्रशिक्षण संस्थांवर करडी नजर ठेवली जातेय. औरंगबाादमधील एका प्रशिक्षण संस्थेतील आणखी एक गैरप्रकार मंगळवारी उघडकीस आला. जिथे सैनिक व पोलिस घडविण्याचे प्रशिक्षण दिले जाते तेथेच देशी दारूचा अड्डा चालवणाऱ्या सहा जणांना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने मंगळवारी अटक केली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

औरंगबााद तालुक्यातील आडगाव (बु.) येथील जय जवान सैनिक, पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण संस्थेच्या इमारतीत बनावट देशी दारू तयार केली जात असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाला मिळाली होती. त्यावरून पथकाने छापा टाकून बनावट देशी दारूच्या 7,132 बाटल्या, चार बॉटलिंग मशीन, बनावट बूच, लेबल्स खोके, 200 लीटरच्या सहा बाटल्या, मोटर, चारचाकी वाहन असा सुमारे 19 लाख सात हजार रुपयांचा ऐवज जप्त केला.

मंगळवारी राज्य उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या या कारवाईत जय जवान सैनिक पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण संस्थेचा संस्थाचलक अशोक किसन डवले याला अटक करण्यात आली. त्याच्यासह विकी जयंतकुमार राघाणी, अमोल कारभारी, अमोल चव्हाण , शेख वसीम, राकेश यादव यांनाही अटक करण्यात आली. या प्रकरणी चिकलठाणा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Comment