अखेर अंनिसच्या प्रखर विरोधामुळं इंदुरीकर महाराजांचे शिवाजी विद्यापीठातील कीर्तन रद्द

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर
कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठात आजी-माजी विद्यार्थ्यांच्या कडून शिवमहोत्सव २०२० या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमात इंदूरीकर महाराज यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता परंतु कोल्हापूरातील अंधश्रद्धा निर्मूलन समितीसह इतर पुरोगामी संस्थांनी केलेल्या विरोधामुळे इंदुरीकर महाराजांचे शिवाजी विद्यापीठातील कीर्तन रद्द करण्यात आलं आहे. मात्र शिव महोत्सव ठरल्याप्रमाणे होणार आहे.

कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठात आजी-माजी विद्यार्थ्यांच्या कडून शिवमहोत्सव २०२०चे आयोजन करण्यात आलेल आहे. या शिव महोत्सवात वादग्रस्त वक्तव्य करणारे इंदूरीकर महाराज यांचं कीर्तन कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता. या कीर्तनाच्या कार्यक्रमाला कोल्हापुरातील अंधश्रद्धा निर्मूलन समिती सह इतर पुरोगामी संस्थांनी तीव्र विरोध केला आहे तर इंदूरीकर महाराजांचा कार्यक्रम समर्थनार्थ युवा सेनेसह इतर हिंदुत्ववादी संघटना उतरल्या आहेत. शिवाजी विद्यापीठातील पदवीदान समारंभ होणाऱ्या सभागृहात इंदुरीकर महाराज यांचे कीर्तन आयोजित करण्यात आलेल आहे आणि याच कार्यक्रमस्थळी विरोध करण्यासाठी अंनिसच्या सीमा पाटील आणि अवनी संस्थेच्या अनुराधा भोसले या दाखल झाल्या होत्या तर इंदुरीकर महाराजांच्या समर्थनार्थ युवा सेनेचे मनजीत माने दाखल झाले होते इंदुरीकर महाराजांच्या कोल्हापूरचा कार्यक्रमावरून अंनिस आणि हिंदुत्ववादी संघटनेचे पदाधिकारी यांच्यात जोरदार बाचाबाची झाली. अंनिसने या कीर्तनाचा कार्यक्रमाला विरोध केला आहे तर हा कार्यक्रम यशस्वी व्हावा यासाठी युवासेना आपली फौज उभी केली.

इंदूरीकर महाराज यांना अंनिस सह इतर पुरोगामी संघटनांचा विरोध आणि हिंदुत्ववादी संघटनांचा समर्थन होतं. इंदुरीकर महाराजांच्या या कार्यक्रमाच्या आयोजन आवरून सुरू झालेला वाद हा कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या दालना पर्यंत पोहोचला इथे दोन्ही संघटनांनी आपलं म्हणणं कुलगुरु समोर मांडलं आणि आयोजकांची बोलून आपण यावरती निर्णय देऊ असं त्यांनी सांगितलं. अखेर काही वेळातच या कार्यक्रमाचे आयोजक असणारे प्रवीण कोडोलीकर यांनी इंदुरीकर महाराज कोल्हापूरला वेळेच्या कारणास्तव येणार नसल्याचं सांगून दौरा रद्द झाला असल्याचं स्पष्ट केलं. इंदूरीकर महाराज यांच्यावरून कोल्हापुरात सकाळपासून निर्माण झालेला तणाव अखेर त्यांचा दौरा रद्द झाल्याने सध्यातरी निव्वळ आहे.

ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.

Leave a Comment