व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

महागाईचा आगडोंब ! घरगुती गॅस 1000 च्या पुढे

हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन | दिवसेंन दिवस महागाईत वाढ होत असताना आता घरगुती गॅसच्या किमतींत साडेतीन रूपयांनी वाढ झाली आहे. आता घरगुती गॅस 1 हजार रुपयांच्या पुढे गेलेली आहे. देशात गॅस दरवाढीमुळे अर्थिक बजेट आणखी कोलमडणार आहे.

घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीमध्ये साडेतीन रुपयांची वाढ करण्यात आली आहे. तर व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत आठ रुपयांनी वाढली आहे. राज्यासह देशात महागाईचा भडका उडालेला आहे. अशातच सर्वसामान्यांचं बजेट आता आणखी कोलमडण्याची शक्यता आहे. आज गुरुवारी ही दरवाढ झालली असून घरगुती आणि व्यवसायिक गॅस सिलिंडरच्या नव्या दर लागू होतील. यापूर्वी चालू महिन्यात 7 मे रोजी 50 रूपयांनी गॅस सिलिंडरच्या दरात वाढ करण्यात आली होती.

देशात पेट्रोल, डिझेलचे दर गगनाला भिडलेले असताना इंधनात सीएनजी, पीएनजी, एलपीजी गॅसच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. गेल्या दीड महिन्यात सीएनजीच्या दरात चारदा वाढ करण्यात आली आहे. तर घरगुती गॅस सिलिंडरचे दरात मे महिन्यात आतापर्यंत दोनदा वाढवण्यात आले आहेत. गॅस दरवाढीमुळे सर्वसमान्यासोबत व्यासायिकांचे बजेटही कोलमडणार असून महागाई आणखी वाढेल.