औरंगाबाद | कोरोनानंतर आता देशभरात ब्लॅक फंगस म्हणजेच म्युकॉर्मयकॉसिस हा आजार डोकेवर काढत आहे. कोरोना होऊन गेलेल्या रुग्णांना हा आजार होत आहे.
शहरात दीड महिन्यात या आजाराचे 201 रुग्ण विविध रुग्णालयात दाखल झाले. त्यातील 16 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे कोरोना झाल्यानं नवीन चिंता सतावत आहे.
कोरोना संसर्गाचे आत्तापर्यंत शहरातील सुमारे 83 हजार नागरिकांना बाधा झाली. यातील 700 जणांचा मृत्यू झाला. 81 हजार रुग्ण कोरोनावर मात करून घरी आले. पण ज्यांना कोरोनाचा जास्त त्रास झाला त्यांना आता म्युकॉर्मयकॉसिसचा आजार होत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे महानगरपालिकेने शहरातील खासगी रुग्णालयांकडून म्युकॉर्मयकॉसिस आजाराच्या रुग्णांची माहिती मागविली आहे. त्यानुसार शहरातील सहा हॉस्पिटलचे हॉस्पिटलने माहिती पाठवली आहे.
यावर आरोग्य अधिकारी डॉ नीता पडळकर याच्याशी हॅलो महारष्ट्राने संवाद साधला असता त्यांनी अशी माहिती दिली कि,
ब्लॅक फंगस हा आजार बुरशीचा रोग आहे. या मध्ये ज्या ठिकाणी हे इन्फेशन होते तो भाग काळसर पडतो. आम्ही शहरातील खाजगी आणि प्रशासकीय हॉस्पिटल यांच्या कडून आम्ही सर्व रुगणांची माहिती मागवली आहे. या मध्ये मधुमेही रुगणांना याचा धोका जास्त आहे. या आजाराचा इलाज लवकर केला तर रुगणां लवकर बारा होईल आणि त्याला धोका कमी असेल.
-डॉ नीता पडळकर, आरोग्य अधिकारी मनपा
https://www.facebook.com/aurangabadnewslive/videos/527589595072791/