आरोग्य केंद्रात चपराश्याला अमानुष मारहाण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

भंडारा : हॅलो महाराष्ट्र – भंडाऱ्यामध्ये एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये रुग्णांची सेवा करणाऱ्या एका डॉक्टराने आपल्याच प्राथमिक आरोग्य केंद्रातील चपराश्याला गळा आवळून लाथा-काठीने अमानुष मारहाण केली आहे. भंडारा जिल्ह्यातील गोबरवाही दवाखाण्यात हि संतापजनक घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या घटनेमुळे तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

काय आहे प्रकरण ?
भंडारा जिल्ह्यातील जिल्ह्याच्या गोबरवाही दवाखान्यात ही घटना घडली आहे. डॉ. कडस्कार असे मारहाण करणाऱ्या डॉक्टरचे नाव आहे. तर नारायण उइके असे मारहाण झालेल्या चपराश्याचे नाव आहे. आरोग्य केंद्राच्या परिसरातच डॉक्टर कडस्कार याने चपराश्याला मारहाण केली आहे. या मारहाणीची घटना मोबाईलमध्ये कैद करण्यात आली आहे.

या डॉक्टरने आपल्याच हाताखाली काम करणाऱ्या चपराश्याला मारहाण का केली, याचे कारण अजून समजू शकलेले नाही. या डॉक्टरने ज्या पद्धतीने कर्मचाऱ्याला अमानुष मारहाण केली आहे. त्यामुळे या मारहाण करणाऱ्या डॉक्टरला जीवन देणारा देव मानावं की शैतान म्हणावं असा प्रश्न भंडारावासियांना पडला आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर सगळीकडे संताप व्यक्त केला जात आहे.

Leave a Comment