दुचाकीवर झाड कोसळून आज्जी-नातवाचा मृत्यू ; गडहिंग्लज-आजरा मार्गावरील घटना

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यात ह्रदय हेलावून टाकणारी घटना शुक्रवारी घडली. चालत्या मोटरसायकलवर झाड कोसळून आजी नातवाचा जागीच मृत्यू झाला आहे. गडहिंग्लज-आजरा मार्गावरील निसर्ग हॉटेलजवळ ही दुर्दैवी घटना घडली. गडहिंग्लज तालुक्यातील अत्याळ येथील राहणारा युवक सतीश जोतीबा शिंदे व त्याची लिंगनूर कसबा नूल येथील राहणारी आज्जी सोनाबाई पांडूरंग जाधव अशी मृतांची नावे आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी कि, सतीश येथील एका खासगी शोरुममध्ये कामाला आहे. तो गुरुवारी सायंकाळी आपल्या आजोळी लिंगनूर येथून आज्जी सोनाबाई यांना घेऊन अत्याळला गेला होता.आज सकाळी कामावर येताना आजीला लिंगनूरला सोडण्यासाठी तिला सोबत घेऊन येत होता. ते गडहिंग्लज-आजरा मार्गावरील निसर्ग हॉटेलजवळ आले असता त्यांच्या दुचाकीवर अचानक झाड कोसळले.

या अपघातात सतीशच्या डोक्याला मार लागल्याने सतीशचा जागीच मृत्यू झाला. परिसरातील नागरीकांनी जखमी सोनाबाई यांना तातडीने उपजिल्हा रुग्णालयात हलविले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. मृत्यू झालेल्या सतीशचे लग्न झाले नसून तो अविवाहित होता. त्याच्या पश्चात कुटुंबीयांमध्ये फक्त आई आहे. सतीशच्या वडीलांचे सहा महिन्यापूर्वीच निधन झाले आहे. तर सतीशची आज्जी सोनाबाई यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, सूना, नातवंडे असा परिवार आहे. या घटनेची नोंद गडहिंग्लज पोलीस ठाण्यात झालेली आहे.

Leave a Comment