“महाविकास आघाडी सरकारमध्ये मित्र पक्षांवर अन्याय, अन्यथा आम्ही नवीन मित्रपक्ष शोधू”: प्रा. जोगेंद्र कवाडे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

“राज्यात महाविकास आघाडीचे सरकार बनविण्यासाठी मित्रपक्षांनीही हातभार लावला आहे, पण सत्ता मिळून अडीच वर्षे झाली तरीही मित्रपक्षांना सत्तेत वाटा मिळालेला नाही. ही राजकीय नीतिमत्ता म्हणता येणार नाही. मित्रपक्षांनी यासंदर्भात वारंवार आठवण करून दिली, तरीही दुर्लक्ष केले जात आहे. आघाडीतील नेत्यांनी गांभीर्याने विचार करावा अन्यथा आम्हाला नवीन मित्रपक्ष शोधावा लागेल,” असा इशारा त्यांनी यावेळी दिला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा अनुयायी असलेल्या अमोल कोल्हेचा नवा चित्रपट राज्यात प्रदर्शित होऊ देणार नाही.

“गांधीहत्येचे समर्थन कदापि सहन केले जाणार नाही. राज्य सरकारनेही चित्रपटाला परवानगी देऊ नये. मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी डॉ. कोल्हे यांच्या भूमिकेला विरोध केला आहे. आम्ही देखील आवाडेंच्या म्हणण्याशी सहमत आहोत. कोल्हेंना पक्षात घेतलेच कसे? असा आमचा प्रश्न आहे. सरकारने चित्रपटाला परवानगी दिली आणि तो प्रदर्शित झाला, तर राज्यभरात चित्रपटगृहांवर हल्लाबोल करू”,असा इशारा हि पिपल्स रिपब्लीकन पक्षाचे अध्यक्ष जोगेंद्र कवाडे यांनी दिला.

पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जोगेंद्र कवाडे हे सांगली जिल्हा दौर्‍यावर आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना कवाडे म्हणाले, “रिपब्लीकन ऐक्यासाठी बाळासाहेब आंबेडकर यांना अनेकदा विनंत्या केल्या, पण रिपब्लीकन पक्षाशी देणे घेणे नाही असे त्यांचे म्हणणे होते. ऐक्याचे वारंवार आवाहन करणारे आठवले बाळासाहेबांना कितीवेळा भेटले हे देखील महत्वाचे आहे. आठवलेंनी स्वत: भेटून प्रयत्न करावेत. एमआयएमसह अन्य पक्षांना सोबत घेणार्‍या बाळासाहेबांना रिपब्लीकनबाबत दुजाभाव का? हे कळत नाही. 1998 मध्ये रिपब्लीकनच्या तिकिटावरच अकोल्यातून खासदार म्हणून निवडून गेले होते, हे लक्षात ठेवावे. ते येणारच नसतील, तर त्यांना सोडून ऐक्याचे प्रयत्न करावे लागतील”, असे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.

Leave a Comment