भूतकाळामध्ये घडलेल्या गोष्टींचा विचार करून भविष्य खराब करू नका..

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Hello Stories | एक प्रसिद्ध वक्त्यांने हातात ५०० रूपयाची नोट दाखवत आपल्या सेमिनारची सुरुवात केली. हॉल मध्ये बसलेल्या सैकड़ों लोकांना त्याने विचारले, “ही ५०० रुपयाची नोट कोणाला पाहिजे?” हॉल मध्ये बसलेल्या खूप लोकांनी हात वर केले.

तो म्हणाला, ” मी ही नोट या हॉल मधील कोणा एका व्यक्तीलाच देईन परंतु पहिले मला हे करुद्या.” आणि त्याने ती नोट चुरगळली आणि तो म्हणाला, “आता ही नोट कोणाला पाहिजे?” तरी सुद्धा हॉल मधील लोकांनी हात वर केले.

“अच्छा” तो म्हणाला, “आता मे हे करू का?” आणि त्याने ती नोट खाली फेकून दिली आणि तो ती नोट पायाने तुडवू लागला. त्याने ती नोट उचलली तर ती नोट खूप चुरगळली होती आणि खूप गहाणही झाली होती.

“वक्ता म्हणाला की अजूनही कोण आहे की त्याला ही नोट हवी आहे?” तरी सुद्धा हॉल मधील लोकांनी पुन्हा हात वर केले.

“मित्रांनो, आज आपण खूप महत्त्वाचा धडा शिकलात. कारण मी या नोटे बरोबर खूप काही केल तरी देखील ही नोट तुम्हाला हवी आहे कारण या नोटेची किंमत अजूनही ५०० रुपयेच आहे.

जीवनात आपण खूप वेळा पडतो, हरतो, कित्येक वेळा आपण घेतलेले निर्णय आपल्याला मातीत घेऊन जातात. त्यामुळे आपल्याला असे वाटू लागते की आपली काही किंमत नाही. परंतु जीवनात तुमच्या सोबत किती वाईट घडले असुद्या किवा भविष्यत घडूद्यात, म्हणून तुमची किंमत कमी होत नाही. तुम्ही खूप अनमोल आहात ही गोष्ट कधी विसरू नका.

एक लक्षात ठेवा. जे भूतकाळामध्ये घडले त्याचा विचार करून येणारे भविष्य खराब करू नका. कारण आपल्या कडे खूप किमती गोष्ट आहे आणि ते म्हणजे आपले अनमोल जीवन. ते आनंदाने आणि सुखात जगा.

इतर महत्वाचे –

इंदुरीकर महाराजां बद्दल च्या या गोष्टी तुम्हाला माहीती आहेत काय?

जॅकलिन बद्दलच्या या गोष्टी वाचून तुम्हालाही धक्का बसेल

राहा आनंदी जगा तंदुरुस्त!

इंटरनेटवर मुली सर्वाधिक काय सर्च करतात ? वाचून तुम्हालाही धक्का बसेल

Leave a Comment